दि. ०३.०१.२०२६..
नविन वर्षात ला पहिला ब्लॉग लिहितोय,खरे तर खूप विषय डोक्यात येतात आणि लिहू - लिहू म्हणेपर्यंत विरून पण जातात, पण आज हा चित्रपट पाहिल्यावर म्हटले आज लिहायचेच.
Experience never gets old, Experience never out of fashion, अश्या वेगवेगळ्या tagline ने प्रदर्शित झालेला २०१५ cha "The Intern" आज परत बघण्यात आला, हा माझा आवडत्या चित्रपटांपैकी एक चित्रपट, त्याच्या tagline च सगळं काही सांगून जातात,पण हा चित्रपट अजून हि बरेच काही शिकऊन जातो...
ह्या चित्रपटाची एक गंमत आहे, हा बघतांना असेच सारखे वाटते की हे सगळे आपल्या अवतीभवती चालले आहे, ह्या सगळ्या पात्रांना आपण रोज भेटतोय...
खरे तरी tagline वापरली आहे ते तर आहेच पण अजून एक गोष्ट ह्यात अधोरेखित होते ती की जी जुनी मूल्ये आहेत चांगले आयुष्य कसे जगावे ती आजही लागू होतात,ती खरेतर कधी जुनी होतच नाही, नव्या युगाप्रमाणे त्याचे स्वरूप फक्त बदलते. आपल्या अगोदरची पिढी,त्यांचे अगोदरची पिढी ज्या काही मूल्यांनी स्वस्थ आणि आनंदी आयुष्य जगत होते,तीच मूल्ये आजही लागू होतात,आणि ती सोडून जगायचे म्हटले तर आयुष्य complicated होते किंवा असे प्रश्न निर्माण होतात की ते सोडवायला गेले की अजून मोठे प्रश्न तयार होतात, आणि त्याच वेळेस ही जुनी मूल्ये ती सगळी प्रश्न झटक्यात सोडवतात आणि आयुष्यं सरळ साधं सोपं बनवून टाकतात.
हे सांगायचे ह्यासाठी, की आपण आज पाश्चात्य जगाचे अनुकरण करतोय अगदी कुठलाही विचार न करता, छोटे कुटुंब, आपण आणि फक्त आपले कुटुंब एवढेच जग, स्वातंत्र्या च्या नावाखाली , एकमेकांना अवास्तव स्पेस देण्याच्या नादात एकमेकांपासून दुरावलो, एकमेकांशी मोकळे बोलणे बंद झाले,शेअर होणे बंद झाले, कोणी धीर देणारे, मी आहे म्हणणारे उरले नाही, मन मोकळे करणेच बंद झाले, ही परिस्थिती पाश्चात्य देशात कितीतरी गंभीर स्वरूप बनून राहिलेय ही ह्या चित्रपटात दाखवलंय,आणि ती परिस्थिती सावरणारा रॉबर्ट तीच जुनी मूल्ये वापरताना दाखवलाय...
आपले नशिब अजूनही चांगले आहे आपल्याला साकारणारे मोठी माणसे आजही आपल्या बरोबर आहेत, त्यांचेकडून आपण काही वारसा घेतलेलाच आहे,पण ते अजून जास्त आत्मसात करून पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे, जेणेकरून तीही पिढी उत्तम आयुष्य जगू शकेल.
हा चित्रपट आवर्जून सगळ्यांनी पहावा, तुम्ही बघताना जेवढा तो कळेल तेवढे कोणी सांगून समजणार नाही, आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या जपल्या नाही तर त्याच पुढे गंभीर प्रश्न बनून पुढे येतात, नवरा - बायको, मित्र - मैत्रिण, ऑफिस, अशा कितीतरी विषयातल्या प्रश्नांवर सोपे उत्तरे देणारी जुनी मूल्ये ह्या चित्रपटात दाखवली आहेत...
काम, नातेगोते, मित्रत्व ह्यात निर्माण होणारे प्रश्न खरेतर आपणच उभे करतो,complicated करतो, आणि मग ती सोडवताना आपलीच दमछाक होते,त्यावेळेस ते प्रश्न सोडवायला ही जुनी मूल्यं च कामाला येतात...
जुने ते सोने उगाच म्हणत नाहीत, अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर, आजच्या gen-z तरुणाईला ही किशोरदा ची जुनी गाणी आवडतात.. लता - रफी त्यांच्याही तोंडावर असतात , आहे की नाही गंमत..
नक्की एकदा पहाच हा चित्रपट, जुन्या व नव्या पिढीनी दोघांनीही, खासकरून आजच्या तरुण पिढीने तर नक्की पहावा..
चित्रपट बघून तुम्हाला कुठली गोष्ट,मूल्ये आठवली ती नक्की कमेंट करून सांगा... वाट पाहतोय..
इथे मुद्दामच जास्त काही लिहिले नाही, कारण तो चित्रपट पाहून अनुभव घेऊन समजून घेण्यात जी मजा आहे ती वाचून नाही जमणार...
नक्की पाहा आणि सांगा..
आशुतोष दंडगव्हाळ...

खरेच आहे , करिअर आणि स्वप्न पुर्ण करण्या साठी किती प्रयत्न करतो आपण आणि ती पुर्ण करण्यासाठी किती गोष्टी मागे पडत जातात त्यांना ही आपल्या स्वप्नांना बरोबर कसे सांभाळावे हे या चित्रपटात दाखवले आहे .खुप छान ब्लॉग आहे 👌👌👍 मनाला भिडणारा आणि खरेच आजच्या तरुण पिढीने आवर्जून बघावा हा चित्रपट आणि शिकवण घ्यावी की ज्करीयर बरोबर आपले आयुष्य balance कसे करावे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक intern हवा. खूपच भारी आहे ब्लॉग असेच लिहित राहा 👌👌👍
ReplyDeleteनक्कीच, असा एक intern आयुष्यात हवाच...
ReplyDeleteखूप सुंदर लेख. भावनिक असणं म्हणजे कमकुवत असणं असं मानणं ही सध्याची फॅशन झालीये. महत्त्वाकांक्षांच्या मागे धावतांना जगण्यातला निखळ आनंद हरवत चाललाय. अशा परिस्थितीत आज ना उद्या आपल्याला जुन्या मूल्यांचं महत्त्व कळतंच.
ReplyDeleteहो ना, आपण कमकुवत नाही हे दाखवण्याचा अट्टाहास इतका वाढलाय की एकवेळेस वेडे होतील पण कोणासमोर मनातले बोलणार नाही,रडून मोकळे होणार नाही, आणि असे एक कवच अवतीभोवती करून ठेवतील की असा एकही माणूस ज्यांच्यासाठी नसतो की त्याच्याजवळ मनातले बोलू शकतील आणि ते तो समजून आधार देईल..
Deleteआता चित्रपट पाहूनच मत प्रदर्शित करतो. पण अगदी छान शब्दांकन केलंय.
ReplyDeleteThank you,nakki paha
DeleteChhan manadani kelelela, values na importance dilela lekh. Prattekane mnapasun bolawe, mag te relatives aso wa friends.
ReplyDeleteThank you, ho na manapasun aani ekdusryanchya bhavnancha aadar karun.
Delete