दि.२४ नोव्हेंबर २०२२...
आयुष्यातील छोटे छोटे प्रसंग, मनात येणारे विचार आणि छोटे - छोटे प्रश्न, त्यावरील मनाला पटतिल अशी उत्तरे लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न!!!!
Friday, November 25, 2022
" Walk a mile in my shoes "...
दि.२४ नोव्हेंबर २०२२...
Monday, November 7, 2022
"ज़िन्दगी ख्वाब है"....!!!
"ज़िन्दगी ख्वाब है"....!!!
परवा काही गाणे ऐकण्यात आले, विषय होता जीवन आणि स्वप्नं. प्रत्येक गाण्यात आयुष्याला / जीवनाला स्वप्नांशी जोडले होते, त्यातले एक " जागते रहो" चित्रपटातले होते, " जिंदगी ख्वाब है" ते गाणे ऐकल्यावर विचार आला खरंच की, आयुष्य म्हणजे स्वप्नच तर आहे, स्वप्नाशिवाय काय वेगळे असू शकेलं ?
आपण आपले आयुष्य आपल्या स्वप्नांच्या अवतीभोवती तर विणतो, त्या स्वप्नांना उराशी कवटाळून तर जगत असतो, सारखे ती पूर्ण कशी होतील ह्याच प्रयत्नात असतो, मग काय हरकतये म्हणायला, की जीवन म्हणजेच स्वप्नं, तुम्हाला काय वाटते...?
अगदी जन्मापासून विचार केला तर त्या बाळाची स्वप्नं काय, आईचे दूध मिळेल, छान पैकी आईच्या कुशीत झोपता येईल, सगळे लाड करतील, येवढे मिळाले की त्याचे जीवन पूर्ण आणि तृप्त.
थोडे मोठे झाले की खूप खाऊ,खूप खेळायला मिळणे,चांगली चांगली खेळणी ह्याशिवाय कुठली स्वप्नं पाहतो आपण,तेवढे मिळाले की मोठेपणी अगदी सगळ्यांना सांगतो माझे लहान पण खूप छान गेले. शेवटी काय तर प्रत्येक क्षण स्वप्नं पाहण्यात आणि ती पूर्ण करून घेण्यात किवां पूर्ण करण्यातच आपण असतो. शेवटी काय तर स्वप्नांवरच आपण जगतो.तेच आपले जीवन.
स्वप्नच तर असतात जी आयुष्याला रंगीत किवां बेरंग करतात, कधी रडवतात,कधी हसवतात, कधी पटकन पूर्ण होतात,कधी होता होता राहून जातात, त्यातूनच मग माणूस म्हणतो माझे आयुष्य सुंदर आहे / वाईट आहे. म्हणजे शेवटी काय तर स्वप्नच ठरवणार तुम्ही आनंदी राहणार की दुःखी.
दिलीप कुमार चे मधुमती मधले गाणे आठवते का, " टुटे हुये ख्वाबो ने हमको ये सिखाया हैं I दिल ने जीसे पाया था आखों ने गवाया है I "
स्वप्नं बघायची आणि ती पूर्ण करायची,तरच आयुष्य रंगीत आणि सुखी होईल,नुसतीच उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणाऱ्या चे आयुष्य दुःखातच जाणार,हो की नाही.....
आशुतोष दंडगव्हाळ......
" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."
दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...
-
दि. २२.०६.२०१९. अपेक्षा.... अपेक्षा...तीन अक्षर,एक कान्हा- मात्र्याचा हा शब्द,पण आख्खे विश्व व्यापून असलेला, हो की नाही...... ह्या...
-
कामानिमित्त नेहमीच प्रवास होत असतो, प्रवासात अनेक प्रसंग येतात, खूप काही बघितल्या जाते, ऐकू येते. असेच कामानिमित्त प्रवासात असताना बघितलेल...
-
नात्यान पलीकडची नाती..... भारतीय माणूस नेहमी आपल्या नातेवाईकांमध्ये रमणारा,सगळ्यांना अभिमानाने सांगेल आमचे येवढे नातेवाईक आहेत,असे तसे. पण...
-
दि.२९.०८.२०१९ "पाळीव प्राणी" अगदी बालवाडी पासून आपण शिकत आलोय पाळीव प्राणी - हिंस्त्र प्राणी. सहसा पाळीव म्हटले की आपल्या समोर,...
-
दि. ३०.०४.२० " मेरा नाम जोकर " - राजु. राज कपूर चा एक गाजलेला चित्रपट, आपल्याकडे चालला नाही,का नाही चालला ते एक कोडेच आहे. च...
-
" कमनशिबी - माझे नशिबच फुटके" ..... तुम्ही म्हणाल काय हे, काय झाले ह्याला,असे का बोलतोय हा, तर मित्रहो मी हा शब्द आजच्या माझ्य...
-
" मिसळ पाव " शनिवारची संध्याकाळ, रविवारचा सकाळचा मिसळपाव चा बेत आखला, आम्ही सगळ्यांनी आनंदानी त्या मेनुला मान्यता दिली,लागलीच ...
-
दि.२४ नोव्हेंबर २०२२... " Walk a mile in my shoes " ...... तुम्हाला लेखाचे शीर्षक वाचून अंदाज आलाच असेल लेख कशावर असेल ह्याचा? शी...
-
दि.१७.०६.२०२२ फुलपाखरू ! छान किती दिसते ! फुलपाखरू या वेलींवर ! फुलांबरोबर गोड किती हसते ! फुलपाखरू पंख चिमुकले ! निळेजांभळे हलव...
-
दि.१२.०८.२०२० " देव की माणूस " विषयावरून लेखाची थोडी कल्पना आली असेल वाचकांना ही अपेक्षा.सध्याचा परिस्थितीवरून ( डॉक्टरांवर...

.jpeg)