दि. २५/०१/२६..
चूक की बरोबर?
प्रत्येक गोष्टीत चूक-बरोबर शोधणे कितपत योग्य आहे?
आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत—
“हे बरोबर आहे” किंवा “हे चूक आहे”.
शाळेतील उत्तरपत्रिका असो, समाजातील वागणूक असो किंवा
नात्यांमधील अपेक्षा, सगळीकडे चूक आणि बरोबर या दोन चौकटी तयार केलेल्या आहेत.
पण प्रश्न असा आहे की, प्रत्येक गोष्टीत चूक आणि बरोबर शोधणे खरंच योग्य आहे का?
चूक-बरोबर ही संकल्पना कुठून येते?
चूक आणि बरोबर ही संकल्पना माणसाने स्वतःच्या सोयीसाठी तयार केली.
कायदा, नियम, शिस्त यासाठी ती आवश्यकही आहे.
पण आयुष्य फक्त नियमांवर चालत का हो, ते भावनांवर, परिस्थितींवर आणि अनुभवांवर चालतं.
जे आज आपल्याला बरोबर वाटतं, ते उद्या चूक ठरू शकतं.
आणि जे आज चूक वाटतं, तेच कधी आयुष्याचा मोठा धडा बनू शकतं.
प्रत्येक गोष्ट काळी-पांढरी नसते ना,आपण ना अनेकदा गोष्टींना दोनच रंग देतो
चूक किंवा बरोबर.पण आयुष्याच्या चित्रात करड्या छटाही असतातच की.
एखाद्याचा निर्णय त्याच्या परिस्थितीतून आलेला असतो. आपल्याला तो चुकीचा वाटू शकतो.
पण त्या व्यक्तीसाठी तोच एकमेव बरोबर मार्ग असू शकतो ना किंवा असेल.
आता हेच बघा ना,आपण नात्यांमध्ये सतत चूक-बरोबर मोजायला लागलो,
तर संवाद कमी होतो , आणि अपेक्षा वाढतात.
कधी “मीच बरोबर” सिद्ध करण्याच्या नादात
आपण माणूस समजून घेणं विसरतो.
नातं जिंकण्यापेक्षा ,वाद जिंकणं महत्त्वाचं वाटू लागतं, आणि तिथेच नातं हरवतं. मग योग्य काय?
योग्य हे नाही की चूक-बरोबर पूर्णपणे नाकारावं.
पण योग्य हे आहे की,प्रत्येक गोष्टीकडे समजून पाहावं
प्रत्येक व्यक्तीला तिच्या दृष्टीकोनातून ऐकावं
आणि प्रत्येक परिस्थितीत लवचिकता ठेवावी
कधी बरोबर असणं महत्त्वाचं नसतं,
तर समजूतदार असणं जास्त महत्त्वाचं असतं.
एकूण काय तर , आयुष्य म्हणजे
फक्त चूक आणि बरोबर यांची यादी नाही.
ते अनुभवांची, शिकण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया आहे.
कधी चूक आपल्याला घडवते, तर कधी बरोबर आपल्याला थांबवते.
म्हणूनच प्रश्न असा नाही की
“हे चूक की बरोबर?”
तर प्रश्न असा असायला हवा की—
“हे मला काय शिकवतं?”
काय वाटते तुम्हाला??? नक्की सांगा..
© 2026 | लेखनाधिकार : आशुतोष दंडगव्हाळ
विचार मांडणी ही वैयक्तिक असून अनधिकृत वापरास मनाई आहे.
👌👌👍
ReplyDelete😊
Deleteबरोबर. नाण्याला दोन बाजू असतात. एक वेळ आपापली चूकबरोबरची व्याख्या असणं ठीक पण माझं तेच खरं असा आग्रह शक्यतोवर नसावा. अर्थात् हे सुद्धा एक मत आहे - ते योग्य असेलच असं नाही. शेवटी परिस्थिती प्रमाणे गोष्टींकडे पाहाण्याची दृष्टी बदलणारच ना!
ReplyDeleteमनातले विचार मांडत राहा. क्वचित कोणाला तरी ह्याबद्दलच प्रश्न पडला असेल.
नक्कीच,प्रश्न नेहमीच पडत असतील पण जाऊदे ना , दे सोडून च्या गोष्टीत, कोणी जास्त लक्ष देत नसतील...
DeleteChangla lekh.👌anubhava mule mansache aayushya ghadate.masana khare pnane samjun ghene imp.
ReplyDelete