Saturday, January 27, 2024

"गीत रामायण"

 दि.२७/०१/२०२४.

II श्री रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे,रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमःll

सद्ध्या सगळीकडे अयोध्येतील श्री रामलल्ला मंदिराचिच चर्चा चालू आहे, समस्त हिंदूचे हृदयस्थ असलेल्या श्री रामाचे भव्यदिव्य असे मंदिर अयोध्येत उभे राहिलेले ह्याची डोळा ह्याची देही आपण पहात आहोत, २२ जानेवारी चा हा मंगलमय दिवस आपण कधीच विसरू शकणार,आपली पिढी भाग्यवान आहे की हे सगळे आपल्या डोळ्यादेखत होतेय. सगळे वातावरण राममय झालेय. सगळीकडे रामरक्षा,रामाची भजने म्हटली जातायेत. महाराष्ट्रात साधारण सगळ्या घरात निदान एकदा तरी गीत रामायण लागले असेल,तसे ते रोझाच लागते,पण ह्या वातावरणात सगळ्यांनी आठवणीने ते लावले असेल आणि ऐकले असेल.
तर आता तुम्हाला समजले असेल की ही वरील प्रस्तावना "गीत रामायण" साठी होती...दोन दिगज्जानी मिळून दिलेली ही अप्रतिम देणगी आपण कधीच विसरू शकणार नाही,विसरल्या जाणारही नाही.
गदिमा आणि बाबुजींनी दिलेला हा अप्रतिम ठेवा युगेन युगे आपल्या मनावर राज्य करत राहील आणि करतोयच कि, हो की नाही..
गदिमां नी संपूर्ण रामायण ५६ गाण्यांमध्ये श्रुखलेत आपल्या समोर ठेवले आणि ती गाणी इतकी सुंदर लिहिलीयेत आणि बाबूजींच्या आवाजात आणि संगीतात ती इतकी सुश्राव्य आणि भावपुर्ण झाली आहेत की श्रीरामाचे चरित्र तो काळ जसेच्या तसा आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो, गेली ८०-९० वर्षे हे गीत रामायण आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे, आपल्या मनावर राज्य करतय. अगदी थोरांपासून आजकालच्या मुला मुलींना ही ते तितकेच ऐकायला आवडते.
मला वाटते गदिमां नी हे महाकाव्य आपल्याला देऊन आपले आयुष्य समृद्ध केलंय, ज्याला मराठी भाषा शिकायची असेल त्याने हे महाकाव्य वाचावे त्याला दुसरे कुठले पुस्तक वाचायची गरज पडणार नाही, छंद,अलंकार, शब्द संग्रह, शब्दालंकार आणि अर्थालंकार इतके सुरेख वापरलियेत की त्याला तोड नाही.असे काव्य परत होणे नाही. 
हे कमी होते की काय म्हणून बाबूजीं नी( श्री.सुधीर फडके) ह्या महाकाव्याला इतके सुरेख संगीत दिलंय आणि त्यांच्याच स्वर्गीय आवाजात आपल्या समोर ठेवले की असे वाटते देवाला आपण एक वर मागतो आणि देव आपल्याला दोन वर देतो. एकतर अजरामर असे काव्य गदिमांचे आणि त्याला संगीत व आवाज बाबूजीं चा, अजून काय हवे आपल्याला, मग हे महाकाव्य ऐकताना आपली अवस्था काय होत असेल हे प्रत्यक्ष अनुभवातून  आपल्याला वेळोवेळी कळलेलेच आहे होय की नाही...

बाबुजींनी संगीत देताना संगीतातले सगळे राग वापरलेले आहेत,कुठल्याही नवशिक्या गायकाने,संगीतकाराने अभ्यासाला घ्यावे असे हे सगळे आहे, ती सगळी गाणी बाबूजींच्या आवाजात ऐकताना सगळे भाव मनात येऊन जातात, भक्तिरसात माणूस चिंब भिजून निघतो, " प्रत्यक्ष्या हून प्रतिमा उत्कट" ऐकताना डोळे कधी भरून येतात काळात नाही... ही अवस्था माझी एकट्याची च होत असेल असे मला वाटत नाही,तुम्हीही ह्याच अवस्थे तून नक्कीच गेला असणार,हे नक्की...

तुमचा अनुभव ऐकायला नक्की आवडेल...

आशुतोष दंडगव्हाळ...

 

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...