मानवी मन - श्रेष्ठ गुरु....
गुरु, आपले आयुष्य घडवणारे,योग्य दिशा दाखवणारे, योग्य - अयोग्य समजवणारे,आणि असे खूप काही. आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर भेटणारे,मार्गदर्शन करणारे, अगदी लहानपणापासून आयुष्य संपेपर्यंत कोणी ना कोणी गुरु बनून आपल्याला काही तरी शिकवत असतात, मार्गदर्शन करत असतात. लहानपणी आजी - आजोबा, नंतर बालवाडी तले गुरु, शाळेतले गुरु, महाविद्यालयातील गुरु, प्रत्यक्ष कामाच्या,नोकरीच्या ठिकाणचे गुरु,असे किती तरी ही यादी न संपणारी. अगदी खाणे - पिणे, राहाणे , समाजात कसे राहावे,घरात कसे राहावे हेपण सांगणारे,शिकवणारे गुरु,किती म्हणून मोजावे. तर असो ,असे हे आपले आयुष्य व्यापून असलेले गुरु मंडळी. ह्यांचेमुळेच आपले आयुष्य घडते किवां बिघडते असे आपण म्हणतो, बरेच प्रमाणात खरेही असते.
पण मला असे वाटते की ही सगळी गुरु मंडळी आपल्याला रस्ता दाखवतात, चांगले - वाईट ,खरे - खोटे हे शिकवतात. हो पण त्यावर चालायचे, ते खरेखोटे ,चांगले का वाईट हे समजून घेण्याचे जे काम असते ते आपल्यालाच करावे लागते, जे आपण आपल्या कुवतीप्रमाणे( बुध्दी म्हणा, परिस्थिती, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती,असे अजून बऱ्याच गोष्टी) आपण करत असतो,करतो.
हे सगळे गुरु प्रत्येकाला सारखीच शिकवण देत असतात, तिथे भेदभाव नसतो. तरीपण एक मुलगा साहेब एक शिपाई होतो असे का? शिकवण एक,चांगले काय वाईट काय ह्याचेही ज्ञान एकच दिले असते मग एक पोलिस आणि एक चोर कसा होतो? ह्या प्रश्नाला खूप उत्तरे असतील, आहेतही. पण मला वाटते ह्या सगळ्याला एकच एक व्यक्ती जबाबदार असते ते म्हणजे तुम्ही स्वतः, आणि तुमचे मन, हेच मन तुम्हाला त्याला पाहिजे तिकडे नेते, मग ते चांगले असेल किवां वाईटही असेल,त्याला जिकडे तुम्हाला न्यायचे असेल तिकडेच तुम्ही जाता,आणि म्हणूनच एकाच शिकवण देऊनही एक मुलगा पोलिस होतो आणि दुसरा चोर.
हेच मन माझ्या - तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु,आणि शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असणारा, तुम्हाला शिकवणारा,तुमची साथ शेवटपर्यंत करणारा एकमेव गुरु. काय वाटते तुम्हाला ह्याबद्दल...,हे कितपत खरे असावे असे वाटते..., मला विचाराल तर मी म्हणेन हो,माझ्या आयुष्यातला सगळ्यात श्रेष्ठ गुरु म्हणून मी माझे मनाला मानतो. पण ह्या माझ्या विचारांमुळे वरील गुरु मंडळींचे माझ्या आयुष्यातले महत्त्व कमी करतोय असे मुळीच नाही,त्यांचे पण तेवढेच महत्त्व आहे पण त्यांचे स्थान वेगळे आहे. ते दिशादर्शक आहेत आणि माझा हा गुरु मला त्याचेवरून चालायचे की नाही हे सांगणारा आहे,त्या किवा अजून दुसऱ्या दिशेने नेणारा आहे. ह्याच गुरूवर अवलंबून आहे मी कुठे जाणार, वर की रसातळाला. वरील सर्व गुरूंशी तुम्ही खोटे बोलून वेळ मारून नेऊ शकता, पण ह्या मन रुपी गुरुशी तुम्ही खोटे बोलू शकत नाही,फसऊ शकत नाही.
ह्या मन रुपी गुरूची दोन रूपे असतील असे मला वाटते,एक काळे म्हणजे वाईट( ज्याला आजकाल negativity म्हणतो आपण.), आणि दुसरे गोरे ( ज्याला आपण positivity म्हणतो) म्हणजे चांगले, तर ह्या दोघांमध्ये सतत दंद्व चालू असते,ह्यात जो जिंकतो, ते रूप आपल्याला त्याच्या विचाराने चालायला लावते,तिथे आपले काहीच चालत नाही. जे रूप आपण स्वीकारतो तसेच आपले आयुष्य घडते, त्यात दुसरे कोणाचेच काहीच हात नसतो,स्वतः आपणच ते स्वीकारलेले असते. ह्याच गोष्टींमुळे आपण आपले आयुष्य चांगले,आनंदी, यशस्वी किवां वाईट, दुःखी,अपयशी बनवतो, कोणी दुसरे ते बनऊ किवां बिघडऊ शकत नाही. तुम्ही स्वतः जबाबदार असता तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी. ते चांगले झाले तरी किवां वाईट झाले तरी,दुसरे कोणीच नाही. ( ह्याला अपवाद असू शकतो,नाही असे नाही.).
एखादी आई पोटतिडकीने कोणाला तरी सांगत असते, अहो आमचा बंड्या नाही हो त्यातला त्याचे मित्रच वाईट आहेत,त्यामुळे तो वाईट मार्गाला लागला,आता त्या भोळ्या आईला कोण सांगणार की अग आई तुझ्या बंड्याच्या मनानेच तो वाईट मार्ग स्वीकारला आहे, त्यात त्याच्या मित्रांना वाईट म्हणून काय उपयोग,त्याचे चांगले जरी मित्र असते तरी असाच वागला असता तुझा बंड्या. अजुन एक नेहमीचे वाक्य,"अरे बघ जरा तुझ्या मोठ्या भावाकडे,तो किती हुशार, नोकरी,घर सगळे कसे छान केलेय,नाहीतर तू नुसता खायला काळ आणि भुईला भार आहेस." आता ह्यात त्या मोठ्या भावाने चांगल्या मनाचे ऐकले असेल तो तसा वागला आणि पुढे गेला,लहान भावानी वाईट मनाचे ऐकले असेल म्हणून तो तसा झाला,दुसरे काही कारण असू शकत नाही ह्यात. असो,अशी खूप काही उदाहरणे देता येतील. सांगणे इतकेच कि तुमचे मन हे तुम्हाला घडवत असते, किवां असेही म्हणता येईल,त्याच्या वराच सर्वस्वी आपण अवलंबून असतो.
आपल्याकडे सगळेच जण नेहमी म्हणत असतात," मन नेहमी प्रसन्न ठेवावे, आनंदी ठेवावे, मनात काही वाईट विचार येऊ देऊ नये, चांगले विचार करावेत, असे अजून बरेच काही, हे सगळे कशासाठी असावे. मन प्रसन्न तर आपण प्रसन्न हेच गणित आहे,म्हणजे शेवटी काय तर,आपल्याला नियंत्रित करणारे कोण तर मन, त्यालाच नेहमी जपले पाहिजे,त्यालाच नेहमी चांगले ठेवले पाहिजे त्याला योग्य दिशेने वळवायला हवे,त्यातल्या काळया बाजूला दाबायला हवे,जेणेकरून आपण आनंदी,यशस्वी राहू शकू,होऊ शकू.
म्हणूनच आपले संत सांगून गेलेत," मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"......
आशुतोष दंडगव्हाळ....