Saturday, June 29, 2024

" Be Remembered "


Dt.29.06.2024..


"Today, after a long time, I got the opportunity to write. Many thoughts have been swirling in my head, but they don't always make it to paper. Today, I finally managed to put one such thought into words.


I read a sentence somewhere, which struck a chord: "The greatest gift in life is to be remembered." It's a beautiful sentence, and so true. You have everything, you can get anything you want, but the joy of being remembered by someone is unparalleled.


When someone remembers us, the joy we feel is indescribable. We may not even realize the value of that memory, but it's the thought that we are in someone's thoughts that matters. It's a feeling that can't be expressed in words, only felt.


For example, when we attend a wedding and someone suddenly asks, "Don't you remember me?" You answered him, oh, Nana uncle, how r u ? The joy he feel in that moment is priceless. It's the same joy we feel when someone remembers our name, our likes and dislikes, or even our favorite dish  bring for us.


The happiness that comes from being remembered is unmatched. That's why I think it's important to be in people's memories. If we can make someone happy just by being remembered, that's a great achievement.


What do you think about this? Do you feel the same way about being remembered?"

Ashutosh Dandgaval....

Sunday, June 23, 2024

"Be Remembered"

 

दि.२३/०६/२०२४...

आज बऱ्याच दिवसांनी वेळ मिळाला लिहायला, खरेतर खूप विषय डोक्यात घोळत असतात, येत राहतात पण प्रत्येक वेळी ते कागदावर येईलच असे नाही, हा ही असाच खूप दिवसांपासून डोक्यात आलेला, त्याला कागदावर यायला आजचा दिवस उजाडला.

वाचले का तुम्ही वरचे वाक्य? माफ करा पण माझे इंग्रजी खूपच कच्चे,  मला हे वाक्य समजले ते असे, "आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे,कोणीतरी आपल्याला त्यांच्या आठवणीत ठेवणे किवा लोकांच्या आठवणीत आपले असणे". काय छान वाक्य आहे ना,आणि खरेही तितकेच , तुम्हाला काय वाटते?

तुमच्याकडे सगळे काही आहे, जे हवे ते घेता आणि आणताही येते,  किमती वस्तू म्हणा किवा खायच्या - प्यायच्या गोष्टी म्हणा, तुम्ही सगळे करू - घेऊ शकता. पण एखादी लहानशी गोष्ट कोणीतरी आपल्याला देतो किव्वा घेऊन येतो तेव्हा होणारा आनंद तुम्ही अनुभवलाय का....त्या आनंदा कडे तुमचे लक्ष गेलय का कधी ? किती आनंद होतो आपल्याला,आपण दहा जणांना दाखवतो ती गोष्ट, अगदी सारखे बघून बघून खुश होतो. असे का होत असावे , कधी विचार आला का तुमच्या मनात? माझ्या मनात आला,आणि त्याचे उत्तर मला,वरच्या वाक्यात मिळालेय " The greatest gift in life is to be remembered ".

त्यावेळेस त्या वस्तूची किंमत तुम्ही बघत नाही,अगदी लक्षही जात नाही,त्या वेळेस फक्त आणि फक्त तुमच्या डोक्यात येते ते हे की समोरच्याच्या आठवणीत आपण होतो आणि त्याने आपल्याला आठवणीत ठेऊन,आपली आवड आठवणीत ठेऊन ती गोष्ट आपल्या साठी आणलिये, तो आनंद तुम्ही फक्त अनुभवता, तो शब्दात व्यक्त करता येत नाही, तो व्यक्त होतो तो असा, "एकाचवेळी चेहऱ्यावर च्या हसू आणि डोळ्यात ल्या आनंदाश्रू नी , हो की नाही.....".

एक प्रसंग बघा, एखाद्या लग्नात आपण जातो, आणि कोणी व्यक्ती अचानक समोर येते आणि विचारते, काय ओळखलस का रे? आणि आपण ज्यावेळेस अगदी त्यांच्या नावासकट त्यांना बस का काका - मामा म्हणून त्यांच्या पाया पडतो त्यावेळेस त्या व्यक्तीला होणारा आनंद त्याच्या डोळ्यात दिसतो, ते अगदी आपल्याला कवटाळून पाठीवरून हात फिरवतात त्यावेळेस त्या स्पर्शातून जाणवतो, तो आनंद तुमच्या मनाला भिडतो ते ह्या वाक्क्या पेक्षा दुसरे काय असणारेय! तो आनंद का होतो तर आपण त्या व्यक्तीला नावासकट लक्षात ठेवले म्हणून. 

खरंच ना, समोरच्याने आपल्याला लक्षात ठेवणे, आपले नाव म्हणा, आवडी - निवडी असोत की, अगदी आपल्याला आवडते म्हणून घरी एखादा केलेला पदार्थ घेऊन येऊन म्हणणे की ह्याला आवडते म्हणून खास घेऊन आलोय/ आलेय. ह्यातला आनंद काही औरच...

म्हणूनच आता लोकांना आपल्या आठवणीत ठेवा,म्हणजे आपोआप तुम्ही पण त्यांच्या आठवणीत राहाल... हा असा निर्भेळ आनंद मिळवायचा असेल तर ,हो की नाही... 

नक्की सांगा तुम्हाला काय वाटते ते ह्या वाक्या बद्दल....


आशुतोष दंडगव्हाळ......

Wednesday, February 28, 2024

II ॐ गण गणपतये नमः II

 दि. २८/०२/२०२४....


आज संकष्टी, लहान - मोठ्यांच्या आवडत्या देवाची गणपती बाप्पाची पूजा,उपवास,दर्शन,मोदक आणि बरेच काही...

सर्व जगभर वेगवेगळ्या अवतारात, नावांमध्ये ह्या देवाची पूजा होते गणाधिपती गणपती...

हो तर हे सगळे लिहावेसे वाटले कारण आज दुपारी संकष्टी निमित्त  मराठी चित्रपट "अष्टविनायक " लागला होता कुठल्या तरी मराठी चॅनल वर, ह्या चित्रपटाची कथा, त्यातले गाजलेले आणि प्रत्येक गणपतीला सगळ्या घरांमध्ये लागणारे "अष्टविनायका तुझा महिमा कसा " हे गाणे.

ह्या चित्रपटाची कथा तशी खूपच साधी आहे,पण चित्रपट बघताना असेच वाटत राहते की हे सगळे आपले आयुष्यच आपल्यापुढे चलचित्र बनून डोळ्यांपुढे दिसतेय. मी हा चित्रपट खूप वेळा पाहिलाय,आणि प्रत्येकवेळी डोळे कधी गळू लागतात कळतच नाही, गाणे ऐकताना तर अगदी ऊर भरून येतो,आणि डोळ्यातून अश्रू वाहून गेल्यावर एकदम हलके वाटते, मनाची मरगळ ,भीती निघून गेलेली असते,सगळे सोपे सोपे वाटायला लागते.

( चित्रपटाची कथा,पात्र,कलाकार ह्याबद्दल काहीच सांगणार नाही,हो मुद्दामून च नाही सांगणार,कारण हा चित्रपट बघून अनुभवण्यासाठी आहे, सांगून ह्यातले भाव कळणार नाहीत,म्हणून तो अवश्य बघा आणि सांगा मी जे अनुभवले ते तसेच तुम्हाला वाटले की नाही..ते)..

आयुष्यात असे काही क्षण किवा परिस्थिती येते की तेव्हा सगळे संपले असे वाटते, आणि त्याच वेळेस एखादी दैवी शक्ती आपल्याला त्या संकटातून तारून नेते, बाहेर काढते, अगदी सहजपणे,जणू काही ते संकट कधी नव्हतेच..

तुम्हाला असे काही होते का? नक्की सांगा....

आशुतोष दंडगव्हाळ....


Saturday, January 27, 2024

"गीत रामायण"

 दि.२७/०१/२०२४.

II श्री रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे,रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमःll

सद्ध्या सगळीकडे अयोध्येतील श्री रामलल्ला मंदिराचिच चर्चा चालू आहे, समस्त हिंदूचे हृदयस्थ असलेल्या श्री रामाचे भव्यदिव्य असे मंदिर अयोध्येत उभे राहिलेले ह्याची डोळा ह्याची देही आपण पहात आहोत, २२ जानेवारी चा हा मंगलमय दिवस आपण कधीच विसरू शकणार,आपली पिढी भाग्यवान आहे की हे सगळे आपल्या डोळ्यादेखत होतेय. सगळे वातावरण राममय झालेय. सगळीकडे रामरक्षा,रामाची भजने म्हटली जातायेत. महाराष्ट्रात साधारण सगळ्या घरात निदान एकदा तरी गीत रामायण लागले असेल,तसे ते रोझाच लागते,पण ह्या वातावरणात सगळ्यांनी आठवणीने ते लावले असेल आणि ऐकले असेल.
तर आता तुम्हाला समजले असेल की ही वरील प्रस्तावना "गीत रामायण" साठी होती...दोन दिगज्जानी मिळून दिलेली ही अप्रतिम देणगी आपण कधीच विसरू शकणार नाही,विसरल्या जाणारही नाही.
गदिमा आणि बाबुजींनी दिलेला हा अप्रतिम ठेवा युगेन युगे आपल्या मनावर राज्य करत राहील आणि करतोयच कि, हो की नाही..
गदिमां नी संपूर्ण रामायण ५६ गाण्यांमध्ये श्रुखलेत आपल्या समोर ठेवले आणि ती गाणी इतकी सुंदर लिहिलीयेत आणि बाबूजींच्या आवाजात आणि संगीतात ती इतकी सुश्राव्य आणि भावपुर्ण झाली आहेत की श्रीरामाचे चरित्र तो काळ जसेच्या तसा आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो, गेली ८०-९० वर्षे हे गीत रामायण आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे, आपल्या मनावर राज्य करतय. अगदी थोरांपासून आजकालच्या मुला मुलींना ही ते तितकेच ऐकायला आवडते.
मला वाटते गदिमां नी हे महाकाव्य आपल्याला देऊन आपले आयुष्य समृद्ध केलंय, ज्याला मराठी भाषा शिकायची असेल त्याने हे महाकाव्य वाचावे त्याला दुसरे कुठले पुस्तक वाचायची गरज पडणार नाही, छंद,अलंकार, शब्द संग्रह, शब्दालंकार आणि अर्थालंकार इतके सुरेख वापरलियेत की त्याला तोड नाही.असे काव्य परत होणे नाही. 
हे कमी होते की काय म्हणून बाबूजीं नी( श्री.सुधीर फडके) ह्या महाकाव्याला इतके सुरेख संगीत दिलंय आणि त्यांच्याच स्वर्गीय आवाजात आपल्या समोर ठेवले की असे वाटते देवाला आपण एक वर मागतो आणि देव आपल्याला दोन वर देतो. एकतर अजरामर असे काव्य गदिमांचे आणि त्याला संगीत व आवाज बाबूजीं चा, अजून काय हवे आपल्याला, मग हे महाकाव्य ऐकताना आपली अवस्था काय होत असेल हे प्रत्यक्ष अनुभवातून  आपल्याला वेळोवेळी कळलेलेच आहे होय की नाही...

बाबुजींनी संगीत देताना संगीतातले सगळे राग वापरलेले आहेत,कुठल्याही नवशिक्या गायकाने,संगीतकाराने अभ्यासाला घ्यावे असे हे सगळे आहे, ती सगळी गाणी बाबूजींच्या आवाजात ऐकताना सगळे भाव मनात येऊन जातात, भक्तिरसात माणूस चिंब भिजून निघतो, " प्रत्यक्ष्या हून प्रतिमा उत्कट" ऐकताना डोळे कधी भरून येतात काळात नाही... ही अवस्था माझी एकट्याची च होत असेल असे मला वाटत नाही,तुम्हीही ह्याच अवस्थे तून नक्कीच गेला असणार,हे नक्की...

तुमचा अनुभव ऐकायला नक्की आवडेल...

आशुतोष दंडगव्हाळ...

 

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...