Saturday, June 29, 2019

" कुठली भाजी "

दि.२९.०६.२०१९.
कुठली भाजी....
आपण रोज किती तरी कठीण प्रश्नांना सामोरे जातो,त्याची उत्तरेही शोधतो,ती बरोबर ही मिळतात.
पण बायको चा( आप - आपल्या स्वतःच्या,गैरसमज नको😁😁) हा प्रश्न जो कोणी माईचा लाल सोडवेल किवा त्याने दिलेले उत्तर काहीही न बोलता मान्य झाल्यास, त्याला मी..... भरभरून हा आशिर्वाद देईल( रोज त्याला त्याची आवडीची भाजी च खायला मिळो)😜😜...
 तर आता ऐका तो प्रश्न,नीट लक्ष देऊन ऐका बरं... परत म्हणू नका आम्ही प्रश्न नीट नाही ऐकला ते...

आज भाजी कुठली करू / करायची ??????????

दचकलात ना, की घाबरलात, जागेवर उडालात ना( डोळ्यासमोर सकाळी ह्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर मिळालेले लेक्चर आठवले का?)😁😁😁.....

आहे उत्तर ह्या प्रश्नाचे,तेपण रोज द्यायचे,देऊ शकाल,देताय?? देणार  अथवा देत असाल आणि त्या उत्तरा नंतर समोर च्या माऊलीचे समाधान झाले असेल तर तुम्ही सुखी संसार कसा करावा ह्यावर मार्गदर्शन करायला तयार झाला आहात असे समजावे😁😁

आई नी हा प्रश्न विचारला तर ठीक होतं हो. आपल्याला जी भाजी आवडते ती सांगुन मोकळे होता यायचे, ती थोडेसे ओरडून ( रोज काय रे एकच भाजी,जरा सगळ्या भाज्या खात चला रे, वगरे) त्याच भाजीला किवा आपल्या नावडत्या भाजीला थोडेसे आवडती करून खाऊ घालायची. त्यावेळेस ह्या प्रश्नाची भीती वाटत नव्हती( लग्नाना नंतर कळले ह्या प्रश्नाची भीती फक्त नवऱ्याला असते,मुलांना नाही).

पण जेव्हा लग्न झाले त्यावेळेस कळले की हा प्रश्ननाचे उत्तर देणे किती कठीण असते ते.

ह्याचे उत्तर देणे अथवा ते बरोबर येणे व त्याचे परिणाम हे त्या त्या वेळेस च्या बायकोच्या मुड वर depend असते. तिने जर रागात,चिडून हा प्रश्न विचारला असेल तर तुम्ही उत्तर काहीपण द्या,तुम्हाला तासभर तरी ( रोज नवीन भाजी कुठून आणू,भाजीवाले कसे त्याच त्याच भाज्या आणतात,महागाई त्यात. तुम्ही आणि तुमची मुलं कशी नाटकं करता, इत्यादी इत्यादी) लेक्चर ऐकावे लागणारच.

कधी कधी तिच्या सासूचा सुद्धा उद्धार केल्या जातो, लाडावून ठेवलंय नुसतं,ह्यांनी नुसत्या सवयी लाऊन ठेवल्या,रोज नवीन काही काही करून खाऊ घालायच्या,आता त्याचा आम्हाला त्रास...

कधी कधी मला वाटते,बायका नुसते आपल्याला हा प्रश्न विचारायचा सोपस्कार करत असतात की काय,त्यांना आपल्याकडून उत्तराची अपेक्षा नसावी,उगाच आपले, "तुम्हाला विचारून सगळे करते बरं" ह्यासाठी ही असेल.

त्यांचे मनात अगोदरच ठरलेले असते की आज काय करायचे,पण ते उत्तर पडताळून पाहण्यासाठी( तुमचे तोंड भाजी बघितल्यावर किती वाकडे होणार,ह्याचा अंदाज घेण्यासाठी,खूपच जास्त वाकडे होत असेल,तर त्यात थोडा बदल करून,तुमचे तोंड थोडे सरळ दिसले की झाले ) १००% बरोबर करून घेण्यासाठी त्या विचारायचे नाटक करत असाव्यात.

एकूण काय तर,हा प्रश्न तुम्ही प्रत्येकवेळी गांभीर्याने घेऊन उत्तर देणे अपेक्षित नसते,त्यावेळी तुम्ही समंजस पणे,तिला हे विचारावे तुझे काय म्हणणे आहे,मग बघा ह्या प्रश्नाचे उत्तर देणे किती सोपे आहे ते. (लेक्चर पासून सुटायचा सगळ्यात सोपा मार्ग,आणि सुखी व शांत संसाराची गुरुकिल्ली( ह्या प्रश्ना पूर्ती बरका)😁😁😁).

असो,असा हा गमतीशीर प्रश्न आहे. देव तुम्हाला ह्या प्रश्नाचे रोज रोज उत्तर द्यायचे बळ देवो😁😁😁.....

( ता.क.: ह्या लेखातील सांगितलेला उपाय हा प्रत्येक घरात,प्रत्येकाला वेगळा वेगळा लागू शकतो,सरसकट हाच उपाय वापरायचा असेल तर ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर वापरणे,चुकीचे अनुभव आल्यास त्यास लेखक जबाबदार नाही😜😀😀😀😀😀)

आशुतोष दंडगव्हाळ .....

Sunday, June 23, 2019

" अपेक्षा "

दि. २२.०६.२०१९.
अपेक्षा....
अपेक्षा...तीन अक्षर,एक कान्हा- मात्र्याचा हा शब्द,पण आख्खे विश्व व्यापून असलेला, हो की नाही......

ह्या शब्दा शिवाय सामान्य माणूस जगु शकतो ह्यावर माझा यत्किंचितही विश्वास बसणार नाही. जर असे कोणी म्हणत असेल तर त्या माणसाला ह्या शब्दाचा अर्थ कळलेला नसेल, किवां तो असामान्य मानव,साधू संत असेल,सामान्य मानव असणे शक्य नाही.

साधू - संतांनी अपेक्षा नाहीत हे म्हणणे समजू शकते,ते सांसारिक नसतात,प्रपंचात अडकलेले नसतात,पण त्यांच्याही अपेक्षा असतातच की, जग दुखः मुक्त व्हावे,कोणीही दुःखी नसावे. स्वतःसाठी त्यांच्या काहीच अपेक्षा नसतील,पण मानव जातीसाठी तरी असणारच की. एकूण काय तर अपेक्षे शिवाय कोणीही नाही,मग आपण तर सांसारिक माणसे,प्रपंचात असलेली,मग आपण अपेक्षेशिवाय कसे जगू शकू?

साध्या,छोट्या,मोठ्या कशा का असेना प्रत्येकाकडून प्रत्येकाला अपेक्षा असणारच,असतातच,त्या नाही म्हणून त्यापासून पळण्यात काहीच अर्थ नाही. मुलांकडून आई - वडिलांना, भावा कडून,बहिणीकडून,नातेवाईकांकडून, शेजाऱ्या कडून समाजाकडून,
गावातल्यांकडून,असे सगळेच,जगच अपेक्षेवर चालू आहे.

माझे असे ठाम मत आहे की,ह्या शब्दा शिवाय जगणे व्यर्थ आहे,ह्याशिवाय जगणे जगणे नाही,ह्या शब्दाला डावलून माणूस कुठलेच काम करू शकणार नाही. खूप काही सांगता येईल, तात्पर्य ऐवढेच की ह्या शब्दाशिवाय आयुष्य नाही....

अपेक्षा, ह्या शब्दाची व्याख्या करणे तसे खूपच अवघड,प्रत्येकाची एक स्वतंत्र व्याख्या तयार होईल,आणि ती बरोबरही असेल,कारण ह्या शब्दाची व्याप्ती च इतकी आहे की, प्रत्येक माणूस त्याच्या विचारानुसार, अनुभवानुसार ह्या शब्दाची व्याख्या बनवेल,कुठेतरी त्या सगळ्याच व्याख्या बरोबर वाटतील. 

इतका छान ,इतका सुंदर हा शब्द,आयुष्य सुंदर बनवणारा,पण का कोण जाणे,आजकाल हा शब्द उच्चारणे अपराध झाला आहे, कोणासमोर हा शब्द उच्चारला तर त्याला दचकायला होते,येवढे काय केले ह्या शब्दाने, काय ह्या शब्दाचा दोष? इतका वाईट झालाय हा शब्द, की समोरच्याला शिवी दिल्याचा भास व्हावा?

मग ह्या शब्दाला पर्यायी शब्द देऊन ( जसे की गरज,कर्तव्य, हक्क) जगणे सुरू केले, शब्द सुटला पण त्यातला आशय सोडला नाही.

आजकाल कुठेही अगदी सर्रास ऐकू येणारे वाक्य," आमची कोणाकडून काहीच अपेक्षा नसते." ह्यात अपेक्षा नसते हे सांगण्यापेक्षा,"कोणीही आमच्याकडून कुठलीच अपेक्षा ठेऊ नये" हेच जास्त ठसक्यात सांगण्याचा प्रयत्न असतो.

आमची मुलांकडून काहीच अपेक्षा नाही,त्यांनी त्यांचे बघावे.ह्यात आम्ही मुलांना किती स्वातंत्र्य दिलंय,त्यांचे त्यांना निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य आहे वगैरे सांगणे जास्त. एका अर्थी हे बरोबर,पण ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना मोकाट सोडून द्यावे,काहीही निर्णय घेतले,काही पण केले तरी विचारू नये, ठीक आहे स्वातंत्र्य देताय पण प्रत्येक माणसाची तेवढी बुद्धी नसते ते स्वातंत्र्य नीट वापरायची,तिथे आपले लक्ष हवेच,त्याला विचारायलाच हवे की तू काय करतोयस,ते जर बरोबर नसेल तर त्याला तसे सांगणे गरजेचे,त्यांनी ते ऐकायलाच पाहिजे, ह्या अपेक्षा ठेवण्यात गैर काय आहे?

अजून एक, लग्न झाल्यावर, तो किवां ती ठसक्यात सांगतात,माझी माझ्या नवऱ्याकडून/ बायकोकडून काहीच अपेक्षा नाहीत,तिने/त्याने ज्याचे त्याचे पहावे,तिने तिचे नातेवाईक पहावे,त्याने त्याचे नातेवाईक,उगाच कुठल्या अपेक्षा ठेऊ नये, स्वतःच स्वतःचा खर्च स्वतः करावा,थोडक्यात काय ttmm. अरे मग तुम्ही लोक लग्नच का करता,लग्न ह्या शब्दाचा अपमान होत नाही का? जर तुम्हाला जबाबदारी नको, नवे लोक नकोयेत मग उगाच लग्नाचा अट्टाहास का? कारण अपेक्षा, मग घरचे खूप अपेक्षा करतील त्या पूर्ण करता येणार नाहीत किवां करायच्या नाहीत म्हणून ही पळवाट.

अपेक्षांचे येवढे ओझे का वाटावे,ठीक आहे आपल्याकडे त्याचा खूपदा अतिरेक होतो,केल्या जातो,पण म्हणून अपेक्षा करणेच सोडून द्यायचे? भीती अशी असते लोकांची की मी अपेक्षा ठेवल्या तर समोरचा अपेक्षा ठेवेल,आणि मलातर ते नकोय,मग आपणच अगोदर ओरडून मोकळे व्हायचे मला कोणाकडून कसल्याच अपेक्षा नाहीत.

अपेक्षा ठेवल्या,त्या पूर्ण नाही झाल्या, किवा पूर्ण करता नाही आल्या,तर अपेक्षाभंग होतो,व त्याने खूप त्रास होतो,म्हणून नकोच ते. अपेक्षाभंगाचा एवढा बाऊ का करावा, थोडे समजुतीने घेतले तर पुढे कदाचित पूर्ण होतील वा करूही शकाल,पण त्यावर हा उपाय तर नाही होऊ शकत की अपेक्षा करणेच सोडून द्यावे. अपेक्षाभंग सहन करायला का शिकत नाही आपण? 

चला तुम्ही अपेक्षा करणे सोडून दिलंय असे मानले,मग तुम्ही सुखी झालाय का हो,सगळे आनंदी आनंद झाले का,तर त्याचे उत्तरही नाहीच मिळेल, उत्तर हो मिळाले असते तर आज जेवढी मनोरुग्ण हॉस्पिटल ओसंडून वाहतायेत ती वाहिली नसती. डिप्रेशन हा शब्द आजकाल सगळीकडे ऐकायला मिळतो,अगदी आपण तो सहज वापरतो,लहानगे ही हा शब्द वापरायला लागलीयत. सगळ्यांनीच जर अपेक्षा करणे सोडून दिलंय मग तर सगळे विश्व आनंदी असायला हवे,मग अजूनही ताण तणाव का? माणूस एकटा का पडलाय,का घरं पहिल्यासारखे भरून नसतात? 

त्याची कारणे आहेत,ह्या अपेक्षा नाही नाही च्या नादात तुम्ही- आम्ही एकमेकांपासून दूर जातोय, संवाद थांबले, एकमेकांशी मनमोकळे बोलणे थांबले, भावा - बहीनीनशी घरातल्या अडचणींबाबत बोलता येऊ नये,इथपर्यंत परिस्थिती आली, नक्कीच कुठेतरी आपण ह्या शब्दाला कमी लेखतोय,त्याचा अर्थच समजुन घ्यायची इच्छा नाहीये आपली,म्हणून हा त्रास. व्यवहारी जगात हा भावनिक शब्द घुसमटून जातोय,तो तर जातोयेच पण त्याबरोबर आपणही फरफटत जातोय,ना इधरके ना उधरके ही स्थिती.

अपेक्षे नकोच त्यापेक्षा त्या योग्य ठिकाणी,योग्य तेवढ्या ठेवल्या तर अपेक्षा भंगाचे दुखः कमी होईल,अपेक्षापूर्ती चे सुख जास्त मिळेल.नाहीच झाल्या पूर्ण अपेक्षा तर अपेक्षा भंगाला तरी का घाबरावे, का तुटून जावे, नाही अपेक्षा पूर्ण झाल्या,पण तुम्ही तुमचे प्रयत्न तर प्रामाणिक केले,हे तरी सुख आहे की. असे समजावे समोरच्या माणसाची तुमच्या अपेक्षा समजुन घ्यायची कुवत नव्हती,किवा तुम्ही चुकीचा माणूस निवडला. त्यातून तुमचे नुकसान होणार नाही येवढे नक्की,पण अपेक्षाच नाही सांगितल्या किवा नाही ठेवल्या, उगाच मनातच कुढत बसलात तर काय उपयोग? 

अपेक्षा भंगाची कारणे बघू यात, एक तुम्ही ती योग्य माणसाकडे ठेवली नसेल, दुसरे ती अपेक्षाच योग्य नसेल,तिसरे ती अपेक्षा अवास्तव असेल, वेळ चुकीची असेल. तुमच्या साठी ती अपेक्षा योग्य असेल पण समोरच्यासाठी ती योग्य नसल्यास अपेक्षा भंग होऊ शकेल. समोरच्याला तुमची अपेक्षाच पूर्ण करायची नसेल, अशी बरीच कारणे निघतील..म्हणून आपण अपेक्षा ठेवायच्या च नाहीत का? उलट आपण योग्य त्या ,योग्य माणसाकडे अपेक्षा ठेवायलाच हव्यात. 

आता तुम्ही म्हणाल आम्ही हे सगळे विचार आणि कारणे बघून समोरच्याकडे अपेक्षा ठेवल्या ,म्हणून मग समोरच्याने परत आमच्याकडे अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर काय करायचे? तर ह्यासाठी मी येवढेच म्हणेन,खरंच जर सहजा सहजी त्या अपेक्षा पूर्ण करू शकत असाल तर नक्की करा,नसतील करता येत तर,स्पष्ट सांगा,ह्यात संवाद वाढेल,समोरच्याची चूक असेल तर ती त्याला कळेल,तोही योग्य अपेक्षा ठेवायची सवय लावून घेईल, पण ह्या सगळ्या गोष्टींचं नको म्हटल्यावर उपयोग नाही. अपेक्षा असतील तरच संवाद होतील,तरच मन मोकळे राहील, बघा पटतय का? 

हो ह्याला अपवाद असू शकतात, काही ठिकाणी समोरची व्यक्ती तेवढी समजूत दार नसेल,अवास्तव अपेक्षा ठेऊन आकांडतांडव ही होईल,पण ह्याची टक्केवारी माझे मते खूप कमी असेल. पण ह्यासाठी सरसकट अपेक्षा शब्दालाच हद्दपार करणे,हा उपाय चुकीचाच.

आपण आजकाल हजार प्रकारची क्लासेस च्या जाहिराती बघतो,अगदी साडी कशी नेसायची ह्याचे पण क्लासेस निघालेत, मग,असे काही क्लासेस काढावेत जिथे अपेक्षा कश्या ठेवायच्या हे शिकवावे कोणी,अगदीच तंतोतंत नाही सांगता येणार पण कळेल तरी की अपेक्षा कशाला म्हणतात,त्या कश्या आणि किती,कोणाकडून ठेवाव्या. हास्यास्पद वाटेल माझे हे बोलणे,पण विचार करायला हरकत नाही.ह्यातून नुकसान तर होणार नाहीच,झाले तर चांगलेच काहीतरी होईल.

आपल्याकडे एक म्हण आहे " अति तिथे माती" ही म्हण आयुष्यात जो विसरणार नाही,त्याला "अपेक्षा" ह्या शब्दाची भीती वाटणार नाही.
असो, सांगणे येवढेच,भरभरून अपेक्षा ठेवा,दुसऱ्यांनाही ठेऊ द्या,काही तुम्ही पूर्ण करा,काही समोरचा पूर्ण करेल, कुढत ,एकटे जगण्या पेक्षा हे नक्कीच बरे नाही का.......

आशुतोष दंडगव्हाळ....

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...