Sunday, May 3, 2026

" मेरा नाम जोकर - राजु."

दि. ३०.०४.२०
" मेरा नाम जोकर " - राजु.
राज कपूर चा एक गाजलेला चित्रपट, आपल्याकडे चालला नाही,का नाही चालला ते एक कोडेच आहे. चित्रपट मोठा होता, पण कंटाळवाणा होता असे वाटत नाही, काही दृश्य त्यावेळेस च्या परिस्थिती नुसार धाडसी होती,पण तो चित्रपट न चालण्याचे एकमेव कारण असू शकेल असे वाटत नाही, कारणे काहीही असो राज कपूर सारख्या माणसाचा तो चित्रपट भारतात जादू दाखऊ शकला नाही, पण रशियात तो लोकांनी डोक्यावर घेतला,आजही भारत म्हटले की रशियन मेरा नाम जोकर आणि राज कपूर ची आठवण काढतात. माझे म्हणाल तर,मला हा चित्रपट खरंच खूप आवडला,त्याला खूप कारणं आहेत. म्हणून त्यावर लिहावं असे वाटले म्हणून ही येवढी प्रस्तावना... जरा मोठीच झालिये,पण त्याशिवाय पुढे जावेसेच वाटेना...
थोडक्यात ह्या चित्रपटाची कथा अशी,ह्यातले प्रमुख पात्र " राजु ". हा मुलगा गरीब घरातला, वडील सर्कस मध्ये, स्टंट करताना वारलेले, त्यामुळे आईला सर्कस,त्यातल्या नोकरीची कमालीची चीड आणि भीती, म्हणून ही आई काबाड कष्ट करून राजुला वाढवत असते,त्याला शपथ घालते की कधीही सर्कस किवा तिथली नोकरी नको.तिचे स्वप्न,मुलानी खूप शिकून मोठे व्हावे,चांगली नोकरी करावी,छान संसार करावा. साधे, सुटसुटीत, कोण्याही आईने आपल्या मुलांसाठी पहावे असे स्वप्न, आणि त्यात गैर ते काय असावे,आपण सगळेच अशीच स्वप्ने पाहत असतो स्वतःसाठी, मुलांसाठी,आणि ज्यांना हे सगळे जमते ते आदर्श वाटतात लोकांना, त्यांची उदाहरणे लोक देतात. तर असेच स्वप्न राजूची आई राजु साठी बघत असते,तर तिथे ह्या पठ्ठ्याचे स्वप्न काय तर ह्याला "जोकर" व्हायचे असते,लोकांना हसवायचे , त्यांची करमणूक करायची,आणि तो तसा प्रयत्नही करत असतो,शाळेत काय किवा बाहेर काय तो  सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करत असतो. लोक त्याच्या गबाळेपणाला, धांद्रटपणाला,गरिबीला,त्याच्या कपड्यांना हसत असतात त्याची मजा उडवतात,त्याचा उपयोग करून घेतात,आणि काम झाले की हाकलून देतात. ते त्यांचे असे हसणे, वापरून घेणे हा मुलगा मजेत घेत असतो,त्याला त्याचे काहीही वाटत नाही,कारण त्याचे ध्येयच ते असते कि काहीही करून सगळ्यांना हसवायचे, एक उत्कृष्ट जोकर व्हायचे, ह्या बदल्यात त्याची कुठलीच अपेक्षा नाहीये,फक्त येवढेच की लोकांनी त्याला एक चांगला जोकर म्हणून ओळखावे...हा राजु शेवटपर्यंत हाच प्रयत्न करत असतो मध्ये मध्ये त्याच्या आयुष्यात सुखाचे क्षणही येतात,पण कोणी न कोणी ते काही काही कारणे देत त्याचेपासुन हिरावून घेतात,एक आई असते तीपण सोडून जाते, चित्रपट पाहताना सारखे वाटत राहाते की जगात लोक दुसऱ्यांचा पायरी म्हणून इतका कसा उपयोग करून घेत असतील, समोरच्याला भावनाच नाहीत का, असे त्याचेशी वागु कसे शकतात, की त्या माणसाचे दुर्दैव,चूकी की त्यानी लोकांच्या हसण्यात स्वतःचे सुख शोधले,इतके प्रश्न निर्माण होतात आणि मग मन खूप उदास होते....
खरे सांगा, असा एखादा राजु तुमच्या आजू - बाजूला तुम्हाला दिसला असेलच, किवां कधी तरी तुमचाच राजु झाला असेल,तुम्ही पण असेच सगळ्यांची मनं सांभाळत आला असाल पण तुमक्या मनाचा कधीच कोणी विचारही केला नसेल,तुम्हाला काय आवडतं,काय नाही आवडत ह्याचा जरा सुद्धा विचार केला नसेल,फक्त आणि फक्त तुम्हाला वापरत आले असतील,आणि काम झाल्यावर खड्यासारखे तुम्हाला बाजूला केले असेल, ही अशी परिस्थिती कधी कधी प्रत्येकाच्याच वाट्याला आली असेल,अनुभवली असेल,त्यावेळेस तुम्हाला कसे वाटले असेल? आपण कधीतरी ह्या अश्या परस्थिती तून गेलो तरी सगळ्यांचा राग येतो,तिथे आपण लगेच बदलतो चांगुलपणा कमी करतो.
पण काहिंचे नशीब ह्या राजु सारखे असते, ते आयुष्यभर दुसऱ्याला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतात,त्यासाठी स्वतःचे आयुष्य,पैसा,भावना,स्वाभिमान सगळे सगळे देतात,समोरचा त्यांना फक्त ओरबाडत असतो,ते सगळे कळूनही हे सतत देत राहतात. स्वतः त्यांना ह्या बदल्यात कधीच काहीच मिळत नाही,साधे दोन प्रेमाचे शब्द सुद्धा ह्या माणसाच्या नशिबी नसतात,इतके दुर्दैवी कोणी असू शकते का, देवानी काहीच लिहिले नसेल का ह्यांच्या नशिबी? त्यांचे कपाळ असे कोरे ठेऊन का बरे पाठवले असेल देवाने त्यांना? स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेऊन दुसऱ्यांना हसवणे,दुसऱ्यांसाठी आनंद शोधणे, समोरच्याला देत राहाणे खरच खुप अवघड असते.. आजकालच्या जगात अशी वृत्ती सांभाळणे धोकादायक आहे,कारण इथे सगळे स्वतःसाठी जगणारे आहेत,पण त्यातही ( ही राजु सारखी माणसे) आशेचा किरण आहेतच की,म्हणून तर जग चालू आहे...
असे कितीतरी राजु ( दुसऱ्यांचा सुखात स्वतः विरघळून जाणारे) आज आपल्या आजूबाजूला आहेत म्हणून आपण जगतोय,  कधी आपण स्वतःच ( थोड्या वेळा करिता का होईना) राजु बनतोय म्हणून हे सगळे चालू आहे, नाहीतर आपण कधीच संपलेलो असतो.राजु एक वृत्ती आहे ती थोडेफार का होईना प्रत्येक माणसाने घ्यायलाच हवी, चला तर मग दोस्तहो आज पण करूया ह्या राजुला ( ह्या वृत्तीला) तुमच्या आमच्यात जपण्याचा.......
आशुतोष दंडगव्हाळ...

11 comments:

  1. ख़ुप छान लेख 👌👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुंदर आणि सखोल लेख लिहिला आहे. छान, असेच लेखन करत राहा.

      Delete
  2. छान - राजू डोळ्यासमोर जिवंत उभा केलास. ह्या राजूचं मला आवडलेलं वैशिष्ट्य म्हणजे भावनाप्रधानता. "वेडा आहे रे तो; फार हळवाय !" असं मानणारं हल्लीचं जग. तू सांगितलंच आहेस वर लेखात की किती व्यक्ति राजूमुळे सुखी होतात. बऱ्याच अंशी त्याच्या वैयक्तिक बलिदानामुळेच. हळवं असणं म्हणजे एक शक्ती आहे खरं तर.
    पण त्याकरता संवेदनशीलतेला दुबळेपणा न मानणं जरुरी आहे. आईला गमावल्यानंतरही लोकांच्या आनंदासाठी "शो मस्ट गो ऑन" म्हणत विदुषकाचे पात्र हसत-हसवत मनापासून निभावणारे असे राजूच आयुष्याचे खरे महानायक. अंतसमयी दुर्योधनाच्या अश्रूंवाटे ओंजळीतून अर्घ्य अर्पण करणाऱ्या दानवीर कर्णाची आठवण येते अशांची जीवनगाथा पाहून.
    पुनश्च लेखप्रपंचाबद्दल अभिनंदन. असंच मनमोकळं व्यक्त होत रहा ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. मला काय सांगायचे होते ते अगदी बरोबर उचललेस, अजून काय हवयं, हीच तर खरी प्रेरणा लिहिण्यासाठी.😊

      Delete
  3. Dear sirji u r such a woderful writter and always writing very sense fully and true which is applicable in day today life.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank u so much,pan mala sirji wagare peksha Ashutosh mhatlele jast awdel😊

      Delete
  4. अतिशय हृदयस्पर्शी लिखाण
    फारच आवश्यक गुण जो सध्या लोप पाव त चालला आहे तू म्हणाल्या प्रमाणे काही जणांमध्ये तो असल्यानेच ही जग रहाती चालू आहे
    अतिशय सुंदर लेख
    असेच हृदयस्पर्शी लेखन घडत राहो

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद,असेच आपला शाबासकीची थाप मिळत राहो,नक्कीच चांगले लिखाण करायचा हुरूप येईल😊

      Delete

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...