दि. ३०.३.२०१८.
द बकेट लिस्ट......( मन मारून जगणे/जगवणे नको )
एक सुंदर इंग्लिश चित्रपट पाहण्यात आला," the bucket list". मॉर्गन फ्रीमन आणि जॅक निकोलसन ह्या दिग्गज कलाकारांनी जिवंत केलेला हा चित्रपट, विषय तसा आपल्याला न आवडणारा, चित्रपटात दोन मरणासन्न पात्र आहेत जे स्वतःचे आतापर्यंतचे आयुष्य कसे जगले,आणि ते जगताना खूप काही स्वतःसाठी करायचे किवा जगायचे जे राहुन गेले, त्याची एक यादी बनवतात,आणि त्या यादीतील गोष्टी कश्या पूर्ण करतात ह्यावर संपूर्ण चित्रपट, बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की आपलिही अशीच बकेट लिस्ट तयार होऊ शकते. आपणही आयुष्यात खूप काही सोडून देतो, कधी परिस्थिती,पैश्यामुळे, कधी वेळे मुळे, कधी जबाबदाऱ्यान मुळे. कारणे बरीच असतील, पण राहून जाते खरे.
आपले आयुष्य तसे खूप साधे असते,थोडा प्रयत्न केला तर प्रत्येकालाच स्वतःसाठी वेळ काढणे जमू शकते, मग आपल्या कडून तो स्वतःसाठीचा वेळ काढणे का होऊ नये?( कधी कुठे पैशांमुळे पण असू शकेल, पण खरंच सांगतो आपण आपल्या कुवतीमधलीच स्वप्नं बघत असतो, त्यासाठी लागणारा पैसा पण असतो,पण आपण तो स्वतः वर खर्च करण्या पेक्षा दुसरीकडे खर्च करतो.) आपल्याला सगळ्यांना एक किडा चावलाय, मीपणाचा. मी नसेन तर असे होईल,मी नाही केले तर कोण करेल, जसे काही आपल्यामुळेच जग चालू आहे, आपण नसलो तर जगबुडी होईल हे आणि असेच काहीसे. खरे सांगायचे तर तुम्ही असल्या-नसल्याने जग चालत किवा थांबत नाही, कोणाचे आडतही नाही. जरा तो मीपणा, लोकांच्या नजरेत मोठे व्हायची हौस सोडली तर अशी बकेट लिस्ट बनवायची वेळ आपल्यावर येणार नाही.
आपल्या ह्या मी पणा मुळे,आपल्या जवळ राहणाऱ्या लोकांची सुद्धा अशीच बकेट लिस्ट तयार होऊ लागते, मग, त्या तुमच्या मोठेपणा करण्याचा फायदा कोणाला,हा विचार व्हायला हवा. स्वतः मन मारून जगतो तर जगतोच, पण स्वतः बरोबर सोबत राहणाऱ्या माणसालाही मन मारायला लावतो,हे कुठले जगणे, ह्यात कुठले मोठेपण...प्रश्न पडतो,पण उत्तर शोधायची तयारी मात्र आपण दाखवत नाही,असे का..
ह्यातून स्वतःसाठी पेक्षा कधी कधी ह्याचीच खंत जास्त वाटते की आपण एखाद्याला आपली गरज असताना त्याचेसाठी आपण काही करू शकलो नाही,भेटू शकलो नाही. ही आणि अश्या बऱ्याच गोष्टींची बकेट तयार होत राहाते.
पण अशी बकेट लिस्ट बनवण्याची वेळच येऊ दिली नाहीतर किती छान...... स्वतःचे आणि आपल्या बरोबर राहणाऱ्यांन च्या मनासारखे जगण्याचा प्रयत्न करून बघायला काय हरकत......
आशुतोष दंडगव्हाळ....

Lekh changla. Sahwasat rahnarya mansanssathi mnapasun , janiv ani kaljipurvak kru shknari manse thodi.Jithe hi atmiyata tithe baki sarv kahi naganya aste. so bucket listch prashn yaychi vel yet nahi!!!
ReplyDeleteचांगला विषय मांडलास. स्वतःवर प्रेम केले तर इतरांबद्दलही प्रेम वाटते. नाहीतर अन्याय झाल्यासारखे वाटत राहते आयुष्यभर.
ReplyDelete