दि.२७ - ३ - २०१८
"योग्य वेळी योग्य गोष्टी ह्या व्हायलाच हव्यात" ......
आपल्याकडे बरेचदा आपण हे वरील वाक्य घरातील थोरा-मोठ्यांच्या तोंडून ऐकत आलोय,ऐकतोय आणि आज आपणही ते सांगतोय. पण खरंच ते वाक्य किती बरोबर आहे, आयुष्यात किती महत्वाचे आहे, ते तुम्हा/ आम्हाला स्वतःची चाळिशी ओलांडल्या शिवाय कळत नाही.
आजुबाजूला जेव्हा बघतो, काही प्रसंगांना सामोरे जातो,कधी आपल्या कीवा कधी आपल्या आजुबाजूच्या लोकांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात त्यावेळेस नक्कीच प्रत्येकाला ह्या वाक्याची आठवण होते,होत असेल,कोणी प्रांजळपणे कबुली देतो, बाकीचे मात्र ते न मानता दुसऱ्यावर खापर फोडून ती कबुली देणे टाळतात. एकूण काय तर ते वाक्य आपण कुठेतरी आयुष्यात मानलेले नसते,त्यावाक्क्याची आठवण ठेवलेली नसते, त्याचे परिणाम म्हणून आपण काही गोष्टींना आयुष्यात मुकतो, कीवा त्या आपल्याला परत मिळत नाहीत.
योग्य वेळी शिक्षण,व्यवसाय/नोकरी, प्रपंच,स्वप्नं सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे,सगळ्याच जागी योग्य हा शब्द हवाच,त्याला सोडून आयुष्य नाही.
माझे स्वतःचेच उदाहरण घ्या, मी योग्य वेळी योग्य डॉक्टर कडे गेलो असतो तर आज माझे दोन्ही कान शाबूत असले असते,पण मी ते नाही केले आणि आयुष्याचे नुकसान करून घेतले,आता एका कानावर अवलंबून आहे, त्याचापण काही भरवसा नाही कधी बंद होईन,पण आता माझ्या हातात काहीच नाही.
हया वाक्यात दोन शब्द महत्वाचे एक " योग्य" आणि दुसरा "वेळ". वेळ जी एकदा गेली की परत येत नसते,काहीही केलं तरी परत मिळणार नसते, आणि वेळ तर भरपूर होता हो पण तो योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी वापरला गेला नाही तर त्या वेळेला पण किंमत राहात नाही. म्हणून ह्या दोन्ही शब्दांचे महत्त्व ज्याला कळले,ज्यांनी त्या दोन शब्दांचा वापर आयुष्यात नीट केला ते नेहमीच यशोशिखरावर असतील, आणि आहे तसेच.
आपण आज बाजारात ज्या लोकांची पुस्तके मार्गदर्शनासाठी घेतो,त्यात ह्या वाक्क्या शिवाय दुसरे काय असते बरे. अश्याच लोकांच्या आयुष्यावरची पुस्तके मग आपण यशस्वी होण्यासाठी घेतो,वाचतो,पण त्यावेळेस आपल्या हातातून ही दोन्ही ( योग्य आणि वेळ ) गेलेले असते.
हो पण वेळ निघून गेली,किवा संधी गेली म्हणून प्रयत्न करणे सोडू नयेत, फक्त होते ऐवढेच की प्रयत्न जास्त करावे लागतात आणि वाट पहावी लागते.
शेवटी महत्वाचे काय तर हेच की " योग्य वेळी योग्य गोष्टी व्हायलाच हव्यात."
आशुतोष दंडगव्हाळ.....

Khupch chhan
ReplyDeleteTrue
ReplyDeleteAgadi khare va yogya.
ReplyDeleteFrom - nirmala
ReplyDeleteTine is Money
ReplyDeleteNice
A stich in time saves nine 👍
*Time
ReplyDeletebarobar. wel hi far mahatwachi aste.
ReplyDelete