भरल्या ताटावरून....
सगळीकडे सध्या चर्चा आहे ती बॉलिवूड क्वीन श्रीदेवी च्या अकाली मृत्यूची,तिच्यावर खुप वेगवेगळे मेसेजेस सोशल मीडयावरून फिरतायेत. खूप जास्त चर्चा होतीय असे नाही वाटत, तीच्या मृत्यूच्या बातमीनंतर जगात,भारतात खूप काही घडले,पण त्यावर काहीच चर्चा झाली नाही किवा त्याबद्दल जास्त बोलले गेले नाही, का असे,सहज मनात विचार आला तिच्या अचानक असे जाण्याचा ( भरल्या ताटावरून उठू नये ) ह्या मराठी म्हणीशी काही संबंध असेल का?
आपल्याकडे घरातले मोठे नेहमी बोलताना ऐकलेय कितीही काही झाले तरी भरल्या ताटावरून उठून जाऊ नये, खरंच आपल्याला असे जाणे किवा कोणी असे करणे आवडत नाही, सगळे चांगले चालू असताना,सगळे सुख आले असताना,अचानक कोणी जर गेले तर,बोलताना सगळे म्हणतात,आता कुठे बरे दिवस आले होते,सुख भोगायचे तर हा/ही असा सगळे सोडून निघून गेला/गेली.
हेच आणि असेच काहीसे श्रीदेवी च्या जाण्याबद्दल वाटत असेल लोकांना,म्हणून त्याची जास्त चर्चा होत असली पाहिजे. तिचे अगोदरचे खडतर आयुष्य,त्यानंतर आलेले सुख,छान छोटेसे कुटुंब,मुलीचे करिअर,स्वतःचे चित्रपट,सगळे सगळे छान चालू,सुरू असताना( हो अर्थातच हे सगळे पेपर किवा सिने मॅगझिन मध्ये वाचलेल्या माहितीवरून बोलतोय) तिचे असे एक्झिट होणे कोणालाच रुचले नसावे म्हणून त्याबद्दल येवढी चर्चा.
साधे पिक्चर मध्ये शेवटी सगळे आलबेल होत असताना हिरो आणि खलनायकाचे धिशुंधिशुं होताना हीरो चा मृत्यू दाखवला तर तो आपल्याला आवडत नाही,ते ह्याच मुळे असावे.
आशुतोष दंडगव्हाळ....

Marathi mhanivar adharit 1dam bhari blog ahe 👌
ReplyDeleteChhan
ReplyDelete