" मिसळ पाव "
शनिवारची संध्याकाळ, रविवारचा सकाळचा मिसळपाव चा बेत आखला,
आम्ही सगळ्यांनी आनंदानी त्या मेनुला मान्यता दिली,लागलीच हातोहात फरसाण आणून घेतले, पावाचे काय,ती म्हणाली ते मी सकाळी आणते.
सकाळी कधी नव्हे ते मी म्हणालो,पाव मी आणतो,त्यावर ती ठसक्यात म्हणाली तुम्हाला तो देणार नाही,माझ्यातला पुरुष जागा झाला,असे कसे तो नाही तर दुसरा,आणि तो मला का नाही देणार,त्याला धंदा नकोय का? त्यावर ती अजून जोरात म्हणाली उगाच नाही तिथे लक्ष घालू नका,मी आणते,त्याने नाही दिले तर तुमचेच वांदे होतील,त्याचे कडचेच पाव तुम्ही खाता बाकीचे तुम्हाला आवडत नाही,आमचेपण नाश्त्याच्या विचका करू नका.
आता तर मी पेटून उठलो,म्हटले काही झाले तरी पाव मीच आण नार.
मी शूर शिपाई पाव आणायच्या कामगिरीवर निघालो, जाताना तरी हिने शेपटीवर पाय दिलाच,त्याने तुम्हाला नाही म्हटले तर त्याला सांगा," वो अॅक्टिवा पे मॅडम आती है ना हमेशा उन्होंने बोला करके". असे सटकले माझे पण तो राग गिळून कामगिरीवर लक्ष ठेऊन निघालो.
पाव वाल्याकडे आलो,त्यांचेकडे मरणाची गर्दी, म्हटले च्यायला घरी लोक स्वयंपाक करतात की नाही, त्या गर्दीत कसेबसे त्या भय्यासमोर जाऊन सांगितले 4 पाव लादी देना. त्याने माझे कडे ना बघता सरळ सांगून टाकले,सिर्फ पाव नाही मिलेगा. त्याला सगळे आमिषे दाखवून झाली,तरी बाबा दाबून नाहीच म्हणाला. तेव्हा कळाले पाव आणणे सोपे नाही राहिले,मला हीचा चेहरा दिसत होता खदखदून हसणारा,कसे जिरवले ते.
म्हटलं तिचेच नाव सांगून बघावे,तुला थोडी कळणार आहे,सांगू घरी आपणच आणले म्हणुन. मग त्या भय्याला हिने सांगितलेले वाक्य ऐकवले, क्या साब पहिले बोलनेका ना,मॅडम को बोलो एकदम ताझा पाव है आज. मी आपला मुस्कटात मारल्यासारखे चुपचाप पावाच्या लाद्या पिशवीत टाकून घरी युद्ध जिंकल्यासारखे आलो. घरी तरी हिने विचारलेच काय माझेच नाव सांगितले ना? 😬😬 मी आपला चुपचाप मिसळ पाव खात होतो,परत कधीच पाव आणायला जायचे नाही ही मनात खूणगाठ बांधून😛😔😊😊
आशुतोष दंडगव्हाळ....

Khupach chhan.
ReplyDeleteThank you
DeleteMast majeshir anubhav
ReplyDelete1dam bhari lekh Misal pav ani comedy
ReplyDeleteBhari re ...
ReplyDeleteSimple n sweet loved it
ReplyDeleteफक्कफ
ReplyDeleteफक्कफ
ReplyDeleteLekh changla ahe. remembering moments of life. Nice Love!!!
ReplyDelete