दोष नेहमी दुसऱ्यांचाच असतो का?
स्वतःकडे पाहण्याची हरवलेली सवय.
आजकाल आपल्या आयुष्यात काहीही चुकलं, काहीही बिनसलं
की सर्वात आधी आपण कारण शोधतो…
आणि ते कारण बहुतेक वेळा “दुसऱ्या व्यक्तीत” सापडतं.
“त्याच्यामुळे माझं promotion राहिलं…”
“साहेबांनी support केला नाही…”
“त्यांनी नजर लावली…”
“नशीबच खराब आहे…”
“घर व्हायचं होतं पण लोकांनी अडवलं…”
हे सगळं बोलताना आपण एक गोष्ट मात्र विसरतो…
खरंच फक्त दुसरेच कारणीभूत होते का?
की कुठेतरी आपणही कमी पडलो होतो?
दुसऱ्यांना दोष देणं इतकं सोपं का वाटतं?
कारण स्वतःची चूक मान्य करणं कठीण असतं.
स्वतःच्या कमतरता स्वीकारायला धैर्य लागतं.
आपण मेहनत घेतली नाही हे मान्य करणं अवघड…
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही हे मान्य करणं अवघड…
आपल्याकडून planning चुकलं हे स्वीकारणं अवघड…
म्हणून मग मन एक सोपा मार्ग निवडतं —
“Blame Game”
कारण दुसऱ्यांवर दोष टाकला की काही काळासाठी मनाला समाधान मिळतं.
आपल्याला वाटतं की आपण बरोबर आहोत आणि जग चुकीचं आहे.
पण सत्य वेगळंच असतं.
प्रत्येक अपयशामागे फक्त नशीब नसतं
हो… काही गोष्टी आपल्या हातात नसतात मान्य..
कधी परिस्थिती साथ देत नाही,
कधी लोक चुकीचे भेटतात,
कधी राजकारण होतं,
कधी खरंच अन्यायही होतो…
पण प्रत्येक वेळी फक्त नशीब किंवा लोक कारणीभूत असतात असं नाही.
कधी कधी आपणच…
योग्य वेळी प्रयत्न करत नाही,
सातत्य ठेवत नाही,
skill वाढवत नाही,
भीतीमुळे मागे राहतो,
comfort zone सोडत नाही,
संधी ओळखत नाही,
आणि नंतर दोष मात्र जगाला देतो.
Promotion का मिळालं नाही?
बहुतेक लोकांचं पहिलं उत्तर असतं —
“साहेबांचे favourite लोक पुढे गेले.”
कदाचित हे काही प्रमाणात खरंही असेल.
पण स्वतःला एक प्रश्न विचारला का?
मी खरंच त्या पदासाठी तयार होतो का?
माझ्याकडे leadership quality होती का?
मी नवीन गोष्टी शिकत होतो का?
माझं communication strong होतं का?
मी फक्त experience वर जगत होतो का?
कारण फक्त वर्षं काम केल्याने growth मिळत नाही…
स्वतःमध्ये बदल केल्याने growth मिळते.
“त्याने नजर लावली…”
आपल्या समाजात एक गोष्ट खूप सहज बोलली जाते —
“कोणीतरी नजर लावली.”
पण खरंच कोणाची नजर आपल्या मेहनतीपेक्षा मोठी असते का?
जर नजरच सगळं ठरवत असेल तर
रोज संघर्ष करून उभे राहिलेले लोक यशस्वी झालेच नसते.
कधी कधी “नजरे” पेक्षा जास्त नुकसान
आपल्या भीतीचं, आळशीपणाचं आणि नकारात्मक विचारांचं होतं.
स्वतःकडे पाहणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही
स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे स्वतःला दोष देत बसणं नाही.
उलट…
ती सुधारण्याची पहिली पायरी असते.
कारण जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो,
तोच पुढे जाऊन बदल घडवू शकतो.
आणि जो कायम दुसऱ्यांना दोष देतो,
तो आयुष्यभर तिथेच अडकून राहतो.
आयुष्यातील सर्वात कठीण आरसा
आरशात चेहरा पाहणं सोपं आहे…
पण स्वतःचा स्वभाव, चुका, कमतरता पाहणं कठीण आहे.
कारण तिथे makeup चालत नाही.
तिथे excuses चालत नाहीत.
तिथे फक्त सत्य दिसतं.
आणि हे सत्य स्वीकारणारे लोकच आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जातात.
प्रयत्न योग्य ठिकाणी झाले का?
बऱ्याच वेळा आपण खूप मेहनत करतो…
पण चुकीच्या दिशेने.
जसं एखादा माणूस रोज धावत असतो,
पण दिशा चुकीची असेल तर तो destination ला पोहोचत नाही.
तसंच आयुष्यातही होतं.
फक्त कष्ट पुरेसे नसतात…
योग्य planning, योग्य वेळ, योग्य skill आणि योग्य attitude पण लागतो.
“नशीब” हा शेवटचा पर्याय असावा
आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी लोक सहज म्हणतात —
“नशीबच खराब आहे.”
पण नशीबावर दोष टाकणं म्हणजे
स्वतःची जबाबदारी संपवणं.
नशीब महत्वाचं आहे…
पण त्याहून जास्त महत्वाचं आहे —
तयारी, सातत्य आणि प्रयत्न.
कारण संधी आली तरी तयार नसलेला माणूस ती गमावतो.
स्वतःला विचारायचे काही प्रश्न
कधी शांत बसून स्वतःला विचारा —
मी खरंच पूर्ण प्रयत्न केले होते का?
मी वेळ वाया घालवला का?
मी भीतीमुळे मागे थांबलो का?
मी नवीन शिकणं बंद केलं का?
मी ego मुळे काही संधी गमावल्या का?
मी फक्त तक्रारी करत राहिलो का?
या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आयुष्य बदलू शकतात.
शेवट…
दुसऱ्यांना दोष देणं खूप सोपं असतं…
पण स्वतःकडे पाहणं खूप कठीण असतं.
आयुष्यात प्रत्येक वेळी आपण चुकीचे नसतो…
पण प्रत्येक वेळी आपण बरोबरही नसतो.
कधी परिस्थिती दोषी असते…
कधी लोक…
आणि कधी आपण स्वतः.
फरक एवढाच —
जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो,
तो आयुष्यात पुढे जातो.
आणि जो कायम blame करत राहतो,
तो फक्त कारणं शोधत राहतो.
कारण शेवटी…
“यशस्वी माणसं कारणं शोधत नाहीत…
ती स्वतःमध्ये बदल शोधतात.”
© आशुतोष दंडगव्हाळ — सर्व हक्क राखीव
या लेखातील सर्व विचार, शब्दरचना आणि लिखाण शैली
लेखकाच्या वैयक्तिक अनुभव, निरीक्षण आणि जीवनातील वास्तवावर आधारित आहेत.
लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय हा मजकूर पूर्णतः किंवा अंशतः
कॉपी, repost, forward किंवा व्यावसायिक वापरासाठी वापरण्यास मनाई आहे.
