दि.३०/०५/२०२६...
आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत…
फोनमध्ये contacts वाढले,
social media वर followers वाढले,
गप्पा वाढल्या,
status वाढले…
पण मनाने जोडलेली माणसं मात्र कमी होत गेली…
कारण आता नात्यांमध्ये प्रेमापेक्षा “सोय” जास्त दिसते…
आणि त्या सोयीसाठी प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात
एक असा माणूस हवा असतो…
जो कायम त्यांच्या मनासारखा वागेल…
एक “जोकऱ”…
जो स्वतःच्या भावना बाजूला ठेवून
समोरच्याला हसवत राहील…
समोरच्याचं दुःख समजून घेईल…
त्याच्या प्रत्येक mood ला सांभाळेल…
त्याच्या चुका माफ करेल…
त्याच्या रागालाही प्रेम समजेल…
पण स्वतःचं मन?
स्वतःच्या वेदना?
स्वतःच्या अपेक्षा?
त्यासाठी कुणाकडेच वेळ नसतो…
लोकांना असा माणूस हवा असतो
जो त्यांच्यासाठी २४ तास available असेल…
त्यांनी message केला की लगेच reply देईल…
फोन केला की सगळं बाजूला ठेवून बोलेल…
त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावत येईल…
पण जेव्हा त्यालाच कोणाची गरज असते,
तेव्हा मात्र त्याच्यासाठी
“मी busy होतो…”
“नंतर बोलू…”
“तू खूप emotional होतोस…”
इतकंच उरतं…
हळूहळू तो माणूस समजून जातो
की त्याची किंमत
त्याच्या मनासाठी नाही…
तर तो किती सहन करू शकतो यासाठी आहे…
तो किती वेळा स्वतःला दुखावूनही
समोरच्याला हसवू शकतो…
तो किती वेळा ignore होऊनही
पुन्हा तसाच प्रेमाने बोलू शकतो…
तो किती वेळा तुटूनही
“मी ठीक आहे…”
हे खोटं हसून सांगू शकतो…
काही लोकांच्या आयुष्यात
असे लोक कायम असतात…
जे स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त जपतात…
दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मारतात…
दुसऱ्यांच्या एका smile साठी
रात्रभर जागतात…
पण त्यांचं दुःख?
त्यांच्या डोळ्यातली झोप?
त्यांच्या मनातला थकवा?
तो कुणाला दिसत नाही…
कारण जगाला नेहमी
आनंदी चेहरा हवा असतो…
मनातल्या जखमा नाही…
आणि गंमत म्हणजे,
सगळ्यांना हसवणारा माणूसच
रात्री उशीमध्ये चेहरा लपवून
सर्वात जास्त रडत असतो…
तो कुणाकडे तक्रार करत नाही…
कारण त्याला माहीत असतं,
लोकांना त्याच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत…
त्यांना फक्त तो
त्यांच्या मनासारखा हवा असतो…
नातं टिकवण्यासाठी
नेहमी एकाच व्यक्तीने adjust करत राहणं,
स्वतःला बदलत राहणं,
स्वतःच्या भावना दाबत राहणं…
हे प्रेम नसतं…
ती हळूहळू स्वतःला हरवण्याची प्रक्रिया असते…
आणि एक दिवस
तो “जोकऱ” शांत होतो…
बोलणं कमी करतो…
अपेक्षा ठेवणं बंद करतो…
कारण त्याला समजतं —
लोकांना खरं तर
भावना असलेला माणूस नको असतो…
त्यांना असा कुणीतरी हवा असतो
जो त्यांच्या आयुष्यात
फक्त हसवत राहील,
सांभाळत राहील,
समजून घेत राहील…
पण स्वतःचं मन मात्र
कधीच व्यक्त करणार नाही…
आणि म्हणूनच…
कधी कधी
सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा
“जोकऱ”च
आतून एकटाच राहतो…!
© 2026 | लेखनाधिकार : आशुतोष दंडगव्हाळ
विचार मांडणी ही वैयक्तिक असून अनधिकृत वापरास मनाई आहे.

Sooo truee
ReplyDeleteYes, it's sad,but true
DeleteHmmmm😞🙂
ReplyDeleteअगदी बरोबर आहे 👌👌👍
ReplyDeleteखरे आहे 👌👌
ReplyDeleteलेखनाच्या माध्यमातून व्यक्त होणे हा एक मन मोकळं करायचा एक चांगला उपाय आहे. बाकी चांगूलपणा व्यर्थ जात नाही.
ReplyDeleteनक्कीच,पण नुसताच चांगुलपणा करत राहिलो आणि त्यातच जीव गेला तर तो व्यर्थ गेल्यातच जमा होतो ना पण...
Deleteतेही बरोबर
Deleteमग,त्यासाठीच लिहिलय...
Deleteआजकालच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना बोलायला सुद्धा कुणाकडे वेळ नाही. तर कुणाकडून अपेक्षा ही करू नये मग अपेक्षाभंग होणार नाही असं मला वाटतं. एखादाच मित्र असावा जिथं आपल्याला पुर्ण व्यक्त होता येईल . प्रत्येक व्यक्ती कडे असा एक माणूस असतो तो वेळ काळ काही बघत नाही. आजकाल बर्याच अंशी दुनिया Give and Take या तत्वावर चालू आहे (नवरा- बायको, मित्र वगळता). त्यामुळे माझं असं मत आहे की हे जोकर फार कमी पहायला मिळतात.
ReplyDeleteमाझ्या मतावर कुणी सहमत नसेलही पण हे माझं मत आहे.
तुमचे मत नक्कीच व्यवहार्य आणि बरोबर आहे सध्या give n take cha जमाना आहे, नक्कीच अपेक्षा ह्या योग्य व्यक्तीकडूनच कराव्यात. Yes, असे जोकर आजकाल खूप कमी झालेत, पण प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात असेच जोकर असावेत असे वाटते, खरा मित्र किंवा नाते नको वाटते कारण प्रत्येकाला त्याचेच ऐकणारा कोणीतरी आयुष्यात पाहिजे असे वाटते, समोरच्याने काहीच व्यक्त व्हायचे नाही.
Delete