दि.१३/०९/२०२३.
अगतिकता की हव्यास??
परवा ऑफिस मिटिंग साठी मुंबई ला गेलो होतो, सकाळी हॉटेल वरून ऑफिस ला रिक्षाने निघालो,आमचा रिक्षा वाला निघाला यूपी चा भय्या, माझे सोबत अजून एक ऑफिस चा मित्र होता, शुद्ध आणि कुठलीही भेसळ नसलेली हिंदी बोलणारा श्यामभाई, आम्ही मार्केटिंग वाल्यांच्या सवयी प्रमाणे त्याचे आणि त्या रिक्षा वाल्याचे इकडचे तिकडचे बोलणे सुरू झाले, काय कुठले,कशासाठी आपले नेहमीचे प्रश्न आणि त्यांची नेहमीचीच उत्तरे.
रिक्षा वाल्याला त्यातून कळले की आम्ही ऑफिस साठी मुंबईत आलोय, झाले ह्याच्यावरून त्या भय्या च्या मनाचा बांध फुटला आणि भडभडून बोलायला सुरुवात झाली, पहिलेच वाक्य " साब अपना गाव छोडके क्यूँ आये इधर, थोडा कम पैसा मिलेगा तो भी चलेगा,मगर अपने गाव मे काम करो, मगर इधर नही". यायला भैय्याचे वाक्य ऐकून डोकेच फिरले, हा गडी यूपी वरून इथे महाराष्ट्रात येऊन काम करतोय,आणि आम्ही एक दिवसा साठी इकडे आलोय तर गडी आम्हाला लेक्चर देतोय.
आम्ही दोघेही एकदमच त्याच्यावर चढलो, " क्या भैय्या,तुम इतना दूर से आके इधर काम कर रहे हो, और हमको बोल रहे हो ,इधर मत आना." येवढे म्हणायचा अवकाश गडी एकदम भाऊक होऊन बोलायला लागला,"अरे हमको ही पता है, हम यहा कैसे रह रहे हैं, अरे बच्चो की याद आती है, मां - बाबुजी कि फिकर रहती है, घरवाली क्या और कैसे संभालती होगी सब,चिंता होती है,मगर कुछ नही कर सकते,साल के पहले किसी का मुंह दिखता नहीं है,कभी जाना भी होता है तो आणे जने का टाइम छोडके मुश्किल से २/३ दिन मिलते है, उसमे क्या देखेंगे,क्या मिलेंगे और क्या बात करेंगे बोलो.भैय्या इधर रहे तो उधर की चिंता, उधर रहे तो यहा की चिंता,अरे जिंदगी जी नहीं सकते,सिर्फ कमाओ और पेट पालो,२००३ से आया हुं इधर २३ साल हो गए साब,आजभी अटका पड़ा हुं,वापस जाने की अभी उम्मीद ही नहीं रही,ऐसा ये चक्रव्यूह में अटक गया हूं भैय्या,जिनके लिए कर रहा हूं वो दिखते नही,सिर्फ इतना है फैमिली को कूछ अच्छा मिल रहा है ये तस्सली बोलके रात में सब को याद करके सो जाता हूं,दूसरे दिन के लिए. इसलिए आपको बोला,कुछ गलत बोला तो माफ करना".
येवढे बोलुन भय्या थांबला,आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो,काय बोलावे ते सुचत नव्हते, तेवढ्यात ऑफिस आले,आम्ही काहीतरी थातूरमातूर बोलून भैय्या ला सोडले,आणि ऑफिस मध्ये शिरलो,पण डोक्यातून भैय्या आणि त्याचे बोलणे काही जात नव्हते.
भैय्या खरेच बोलत होता की, आपण चार पैसे जास्त मिळावे म्हणून आपल्या लोकांना सोडून दूर कामाला येतो,पण त्या चार अधिकच्या पैशांसाठी मोलाचे काही गमवून तर नाही ना बसत? हा विचार व्हायला हवा खरा,ठीक आहे परिस्थितीने काही गोष्टी कराव्या लागतात,तिथे पर्याय नसतो,जसे कि तो रिक्षा वाला भय्या,पण सगळ्यांच्याच बाबतीत असे नसावे , नाही का? बरेचसे लोक फक्त पैसा जास्त मिळतो म्हणून दूर जातात, राहतातही,त्यांच्या मनात हे असे भैय्या सारखे विचार येत नसतील का कधी? त्यांच्या नाही तर त्यांच्या परिवारातील लोकांच्या तरी मनात असे विचार येत असतील का? वाटत असेल का त्या भैय्या ला की,परिवारातल्या कोणी सदस्याने म्हणावे,आम्ही थोडी जबाबदारी उचलतो किवां आहे त्यात आपण सुखाने राहू पण एकत्र राहू,वेगळे असे दूर नको,तुम्ही असे दूर जाऊ,राहू नका आम्हाला सोडून.
.jpeg)
सगळ्या मध्यमवर्गीयांचा आणि कामकरी वर्गाचा हमखास अनुभव आहे हा. म्हटलं तर कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याची महत्वाकांक्षा म्हटलं तर गरजां पोटी जन्माला आलेली अगतिकता, दोन्ही म्हणता येईल. छान लेख 👌
ReplyDeleteYes, तेही खरेच पण कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याच्या नादात कुठेतरी कुटुंबच गमवायची वेळ येऊ नये येवढेच,हो की नाही? Thank you...☺️
DeleteBarepaiki kahina garjesathi karawe lagte. Mutual understanding aste kadhi kadhi.Changla lekh👍
ReplyDeleteYes,काहींची गरज,काहींची महत्त्व कांक्षा, काहीचा हव्यास, काहींची मजबुरी..
DeleteʻOhana
ReplyDelete👌🏻Time Together as a family is Gift
Yes
Delete