"ज़िन्दगी ख्वाब है"....!!!
परवा काही गाणे ऐकण्यात आले, विषय होता जीवन आणि स्वप्नं. प्रत्येक गाण्यात आयुष्याला / जीवनाला स्वप्नांशी जोडले होते, त्यातले एक " जागते रहो" चित्रपटातले होते, " जिंदगी ख्वाब है" ते गाणे ऐकल्यावर विचार आला खरंच की, आयुष्य म्हणजे स्वप्नच तर आहे, स्वप्नाशिवाय काय वेगळे असू शकेलं ?
आपण आपले आयुष्य आपल्या स्वप्नांच्या अवतीभोवती तर विणतो, त्या स्वप्नांना उराशी कवटाळून तर जगत असतो, सारखे ती पूर्ण कशी होतील ह्याच प्रयत्नात असतो, मग काय हरकतये म्हणायला, की जीवन म्हणजेच स्वप्नं, तुम्हाला काय वाटते...?
अगदी जन्मापासून विचार केला तर त्या बाळाची स्वप्नं काय, आईचे दूध मिळेल, छान पैकी आईच्या कुशीत झोपता येईल, सगळे लाड करतील, येवढे मिळाले की त्याचे जीवन पूर्ण आणि तृप्त.
थोडे मोठे झाले की खूप खाऊ,खूप खेळायला मिळणे,चांगली चांगली खेळणी ह्याशिवाय कुठली स्वप्नं पाहतो आपण,तेवढे मिळाले की मोठेपणी अगदी सगळ्यांना सांगतो माझे लहान पण खूप छान गेले. शेवटी काय तर प्रत्येक क्षण स्वप्नं पाहण्यात आणि ती पूर्ण करून घेण्यात किवां पूर्ण करण्यातच आपण असतो. शेवटी काय तर स्वप्नांवरच आपण जगतो.तेच आपले जीवन.
स्वप्नच तर असतात जी आयुष्याला रंगीत किवां बेरंग करतात, कधी रडवतात,कधी हसवतात, कधी पटकन पूर्ण होतात,कधी होता होता राहून जातात, त्यातूनच मग माणूस म्हणतो माझे आयुष्य सुंदर आहे / वाईट आहे. म्हणजे शेवटी काय तर स्वप्नच ठरवणार तुम्ही आनंदी राहणार की दुःखी.
दिलीप कुमार चे मधुमती मधले गाणे आठवते का, " टुटे हुये ख्वाबो ने हमको ये सिखाया हैं I दिल ने जीसे पाया था आखों ने गवाया है I "
स्वप्नं बघायची आणि ती पूर्ण करायची,तरच आयुष्य रंगीत आणि सुखी होईल,नुसतीच उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणाऱ्या चे आयुष्य दुःखातच जाणार,हो की नाही.....
आशुतोष दंडगव्हाळ......
.jpeg)
वा वा, खरंय.
ReplyDeleteकाही गोष्टी कधी कल्पना केलेली नसताना आपसूकच मिळतात तर काही गोष्टी आयुष्यभर त्यामागे धावून देखील मिळत नाहीत.
अशा वेळेस असा प्रश्न पडतो, स्वप्नं खरी की जीवन , की जीवन म्हणजेच स्वप्नं!
तेच तर😊
ReplyDeleteखुप छान लेख .👌🏻👌🏻👍🏻
ReplyDeleteलेख खूपच छान आहे ,खरे आहे जीवन आहेच Swapna सारखेच👌🏻👌🏻👍🏻
ReplyDelete😊
Delete👍Chhan lekh.Swapna hi prerana astat aaushyasathi. Kadhi satyat lagech utrtat. Tar kahinsathi wel yawi lagte.
ReplyDeleteनक्कीच, प्रेरणा असतातच, अजून एक नवीन व्याख्या जीवनाची...
Delete