तुम्ही म्हणाल काय हे, काय झाले ह्याला,असे का बोलतोय हा, तर मित्रहो मी हा शब्द आजच्या माझ्या लेखाचा विषय आहे, त्यासाठी हे शिर्षक घेतलेय,कारण ह्याला पर्यायी शिर्षक देणे मला योग्य वाटले नाही, त्याला कारण आहे, हा शब्द किवा हे वाक्य. " माझे नशिबच फुटके, मी कपाळ करंटा, कमनशिबी आणि अजून काय काय. हे असे शब्द/ वाक्य, तुम्ही/ आम्ही रोज ऐकत असतो, कधी कधी म्हणतही असतो.
आपण किती सहजपणे,कधीही,कुठेही,जराही विचार न करता, मनाविरुद्ध थोडे काही झाले की म्हणून मोकळे होतो,माझे नशिबच फुटके,असे कसे देवानी माझे नशिब लिहिले,असे म्हणून कधी देवाच्या, कधी आई - बापाच्या,कधी ऑफिस च्या,कधी बॉस च्या,कधी अजून कुठल्या नावाने आपल्या नशिबाला कोसत असतो, आपण नुसते कारणेच शोधत असतो त्या नशिबाच्या नावाने बोटे मोडायला,हो की नाही करतो ना आपण असे?
पण कधी आपण हा विचार करतो का, खरच आपण हा शब्द वापरायला हवा का? खरंच का हा शब्द इतक्या सहजरीत्या वापरण्यासारखा आहे का? ह्या शब्दाला स्वतःचे असे वजन उरलेच नाही का आपल्या लेखी, की इतक्या सहजरित्या आपण तो कधीही,कुठेही काहीही मागचा पुढचा विचार न करता वापरायला लागलोय?
मला ह्या प्रश्नाचे उत्तर विचाराल तर माझे उत्तर "हो" हे असेल.आपण ह्या शब्दाचे गांभीर्य,त्याचा खरा आशय,तो शब्द उच्चारणे किती वाईटपणाचे आहे हे सगळे विसरून गेलोय. आपल्या घरातील वयस्कर ( आजी - आजोबा) मंडळी हा शब्द वापरताना चारदा विचार करून वापरताना आपण पाहाल,पण मग आपणच हा शब्द इतक्या सहजरीत्या का वापरायला लागलोय,समोरच्याची सहानभूती मिळवायला हाच शब्द आता उरलाय का,साधे पणाने सांगितले तर समोरच्याला ते खरे वाटत नाहीये का? प्रत्येकवेळी आपल्या सांगण्याच्या गांभीर्या साठी जर हा शब्द वापरावा लागत असेल तर अश्या ठिकाणी आपण आपले म्हणणे,सांगणे मांडणे कितपत योग्य? त्याही पेक्षा महत्वा चा प्रश्नः हा आहे की आपण प्रत्येकवेळी नशिबालाच का दोष देत बसावे?
एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल,तुम्हाला जे हवे ते मिळत नसेल, तर त्याला फक्त एकटे नशिबच दोषी कसे असू शकते, हा विचार कधी आपण करणार आहोत की नाही?
समजा एखादी गोष्ट नाही मिळाली आपल्याला,नाही मनासारखे काही झाले त्यात, तर ती आपल्याला का मिळाली नसेल हा विचार अगोदर व्हायला हवा की नको, ती मिळवण्यात कुठे आपले प्रयत्न पुर्ण होते का,ते बरोबर होते का,ती गोष्ट खरंच आपल्यासाठी महत्त्व पुर्ण होती का? ह्या आणि अश्याच प्रश्नांची उत्तरे आपण शोधायचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून केला जातो का? आपण देवा वर श्रद्धा ठेवणारी माणसे,मग नेमके आपण हे असे काही मिळाले नाही, किवा मनासारखे काही झाले नाही की त्याच देवाला दोष का देतो ज्याचेवर आपली अपार श्रद्धा आहे? देव कोणाचे वाईट करत नाही,कोणाचे नशिब तो वाईट लिहीत नाही, त्याच्या प्रत्येक गोष्टीला, त्या गोष्टी च्या असण्याला कारणे असतात,हे तुम्ही मानता, हो की नाही? मग नेमके आपल्या मनासारखे काही न मिळाल्यावर आपण लगेच देवाला कोठडीत का उभे करतो? नशिबाला दोष का देतो? काही ती गोष्ट सौम्यपणे मान्य करतात की जाऊदे आपल्या नशिबात नव्हती ती गोष्ट,म्हणून सोडून देतात. तर काही जण आकांडतांडव करून नशिबाच्या नावाने बोटे मोडून,शिव्याशाप ( कमनशिबी,कपाळकरंटा) करून ,व्यसन करून आपले दुःख व्यक्त करतात.पण खूप थोडी लोक असतील जे नशिबाला दोष न देता त्यामागची कारणे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतील,आणि मला वाटते हीच ती थोडी लोक आयुष्यात सुखी आणि यशस्वी झालेली आपण पाहात असू, आणि हेच सत्य आहे असे मला मनापासून वाटते.
आता कधी असेही होते की आपण खूप प्रामाणिक प्रयत्न करूनही काही कारणांनी मनासारखी गोष्ट आपल्याला मिळत नाही, आणि तीच गोष्ट दुसऱ्याला काहीही ना करता सहजरीत्या मिळून जाते. मान्य आहे अश्या वेळी मनस्थिती खरंच खूप खराब असते,होते पण,काही ते सहन करू शकतात ,काही नाही.अश्या वेळेस सारासार विचार करायची क्षमता सुद्धा जाते,पण मग अश्याच स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्या आजूबाजूला आपली माणसे,नातेवाईक,मित्र असायला हवीत,जी आपल्याला ह्या स्थिती तून बाहेर यायला मदत करतील,बरोबर की नाही? असे काहीच आपल्या आयुष्यात अतर्क्य घडत नाही ज्याला उपाय नसतील किवा आपण प्रामाणिक पणे प्रयत्न केल्यावर गोष्टी मनासारख्या होतील,मिळतील.( हे मी ९९% लोकांच्या बाबतीत बोलतोय, १% असे असतीलही की खरंच त्यांना कमनशिबी हा शब्द वापरावाच लागत असेल.).
एखादी गोष्ट आपल्याला नाहीच मिळाली तर असे आपण का समजू नये की ह्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्या नशिबात असू शकेल,मिळणार असेल,यादृष्टीने विचार करून तसे प्रयत्न करावे, प्रयत्नांची दिशा बदलून बघावी,मार्ग वेगळे निवडावेत, नुसते नशिबाला दोष देऊन शांत बसण्यात काय हाशिल?
ह्यापुढे स्वतःसाठी " कमनशिबी" हा शब्द वापरायच्या अगोदर श्रीकृष्णाला( आता तुम्ही म्हणाल ते देव होते,पण तरीही मी त्यांचे नाव घेऊन,का ते तुम्ही मला सांगा,नक्की सांगा.) महाभारतातील पितामह भिष्माना, कर्णाला नक्की आठवा,आणि मगच स्वतःसाठी कमनशिबी शब्द वापरणे खरंच गरजेचे आहे का ते ठरवा....
मी श्रीकृष्ण,पितामह भीष्म,आणि कर्णाचे उदाहरण का घेतले असेल? तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट बघतोय....
आशुतोष दंडगव्हाळ.....

👌👌👍
ReplyDelete👍🏻
Deleteअगदी बरोबर; सगळ्यात पहीलं म्हणजे शब्दांचं सामर्थ्य समजूनच ते वापरावेत. साधं शर्टचं बटण सोमवारी सकाळी तुटलेलंय् हे कळलं तर लगेच कमनशिबाचा पाढा वाचणं योग्य नव्हे.
ReplyDeleteश्रीकृष्ण, पितामह भीष्म, आणि दानवीर कर्ण सगळ्यांनाच पात्रता आणि कर्तृत्व असूनही आयुष्यभर दुःख वा उपेक्षा सोसावी लागली; पण म्हणून ते नशिबाला दोष देत बसले नाहीत.
श्री श्री रविशंकर गुरूजी म्हणतात, हातातले कार्य करताना केवळ आजचाच क्षण हातात आहे ह्या भावनेने जीवतोड मेहनत करा, मात्र फळ मिळण्यासाठी जीवन अनंतकाळ चालणार आहे असा संयम बाळगा. ह्या नाहीतर पुढच्या जन्मी फळ मिळेलच ही खात्री ठेवा.
उत्तम लेख, शुभेच्छा!
अगदी खरे👍🏻
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteThank you so much 😊
Delete👌👍
ReplyDeleteNot only this we should avoid all negative words when we all are so Blessed
Yes very true 👍🏻
Deleteअतिशय सुरेख आणि वास्तव परिस्थितीचे दर्शन दर्शविणारा लेख
ReplyDeleteप्रत्येकाने पलायनवादी वृत्त्ती सोडून जी कर्म केली आहेत त्यानुसार फळे उपभोगणे अपेक्षित आहे.त्याकरीता नशिबाला दोष देणे,इतरांच्या नावाने बोटे मोडणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखं आहे.
अतिशय सुंदर वास्तव लेख
असेच लेखन करीत रहा अश्या शुभेच्छा
Thank you so much 😊.
Deleteमुळात हि गोष्टच मला पटत नाही कारण, हे ठरवणारे आपण कोण ? आपल्याला कुणी हा अधिकार दिला ?त्यामुळे मी म्हणेन कि, हा शब्द वापरणारे सगळे पळकुटे आहेत.
Deleteथोडक्यात म्हणजे नशिबाला दोष देणे म्हणजे पळवाट शोधणे ............
एकदम बरोबर, हेच तर मला सांगायचे होते👍🏻🙏🏻
Deleteछान विचार आणि मांडणी 👌👌मनुष्य आपण केलेल्या कर्माचे , पूर्व संचिताचे फळ आयुष्यभर भोगत असतो. भोग हे भोगून संपवायचे असतात, ते देवांना पण चुकत नाहीत. देव आणि महापुरुष हि अपार कष्ट करून, प्रापंचिक दुःख भोगून यशस्वी झाले. नशिबाला दोष देणे म्हणजे आपले भविष्य हि संकटात आणल्यासारखे आहे, कारण आपण जे बोलतो त्याला वास्तू 'तथास्तू' म्हणत असते!!. कितीही वाईट परिस्थितीत वाचेवर ताबा ठेवायला शिकले पाहिजे. नशिबाला दोष देणे म्हणजे आपणच केलेल्या वाईट कर्मावर शिक्कामोर्तब!
ReplyDeleteभोग हे भोगून संपवायचे असतात ..... 100 % AGREED WITH NEETA JI
Deleteम्हणजे मी जे लिहितोय,मला काय म्हणायचे,सांगायचे ते कळतेय सगळ्यांना हे बघून खूप आनंद होतो,हुरूप येतो लिहायला😊
Delete