दि.२५.७.२०१९.
प्रश्न...????
माणसाला जगवणारा शब्द. ह्या एकाच शब्दासाठी बहुतेक माणूस जगत असावा,असेल आणि आहे. प्रश्न नसतील तर आयुष्यात मजा नाही,हे म्हणजे मीठा वाचून भाजी जशी आळणी लागते तसे आहे. ह्याच्या असण्या - नसण्या दोन्हीसाठी आवश्यक हा शब्द वापरू शकतो. आयुष्य अर्थपूर्ण जगायचे असेल तर प्रश्न हवेत,पण ते इतकेही नकोत की आयुष्यच संपेल.आहे की नाही गमतीदार( प्रश्न) शब्द.
ह्या प्रश्नाने मानवाला विज्ञान,भाषा,गणित,भूगोल,इतिहास,वैद्यकशास्त्र दिलं,आणि त्याचमुळे आज मानव प्रगती करू शकला,समृद्ध झाला.( हे असे मानवाने समृद्ध होणे चांगले झाले की वाईट हे त्या एकट्या देवाला माहीत...😁😁,असो,हा गमतीचा भाग.) खरंच प्रश्नच नसते तर माणूस प्रगत होणे,नवनवीन शोध लागणे कसे काय शक्य झाले असते? हा गडी होता म्हणून सगळे झाले आणि होतंय.
सगळेच बोलतात,माणूस अनुभव घेऊन, गरजे मुळे, एक एक गोष्ट शिकून प्रगत होत गेला,मी म्हणेन तो प्रश्नांमुळे प्रगत होत गेला,त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा नादात त्याची प्रगती होत गेली,समृद्ध होत गेला. फक्त गरज आणि अनुभव माणसाला प्रगत नाही करू शकणार. त्यासाठी प्रश्न पडणे,आणि त्याची उत्तरे शोधण्याची तयारी असणे, तेव्हाच प्रगती होते,यशस्वी होता येते.
आपण आयुष्यात प्रश्र्नांपेक्षा उत्तरालाच जास्त महत्त्व देतो,खरेतर प्रश्न आहेत म्हणून उत्तराला महत्त्व,नाहीतर उत्तर हा शब्द पण अस्तित्वात नसता. प्रश्नावर लक्ष केंद्रित केले तो समजून घेतला तर उत्तर मिळायची भीती वाटत नाही,ते मिळतेच,म्हणून प्रश्नाला महत्त्व देणे गरजेचे.
सगळीकडे अाताशी एक वाक्य ऐकायला मिळते,"असा प्रश्नच नाही ज्याचे उत्तर नसते". अगदी बरोबर, पण मी ह्या वाक्यात थोडा बदल करेन, " देवांनी निर्माण केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे,पण मानवनिर्मित प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण." ( ह्या वाक्याला स्पष्ट करण्यासाठी मी उदाहरण नाही देणार कारण,त्यासाठी एक वेगळाच लेख लिहावा लागेल,सुज्ञ वाचकांना मला काय म्हणायचे ते कळलेच असेल.🤗 ).
आयुष्यात ह्या प्रश्नांमुळे च माणूस यशस्वी किवा अयशस्वी ते ओळखले जातो, ज्याला आयुष्यातली प्रश्न चांगले सोडवता आले,आणि त्याआधारे त्यांनी आयुष्य समृद्ध करून घेतले तो यशस्वी, दुसरा ज्याला ह्या प्रश्नांची उत्तरे नाही जमली, किवा उत्तरे मिळूनही ज्याला ती नीट वापरता नाही आली,त्याने प्रश्नांची उत्तरे चुकीची मिळवली, तो अयशस्वी झाला,प्रगती नाही करू शकला. दोन्ही बाजूला प्रश्न होते म्हणून हे ठरवता आले, हे प्रश्नच नसते तर.....
हे प्रश्न माणसाला प्रगत करतात, यशस्वी करतात,दुसरीकडे ह्याच प्रश्र्नांपायी माणसे देशोधडीला लागतात,वेडी होतात,जग सोडायला तयार होतात,असे कसे हे प्रश्न,इतकी जबर ताकत ह्यांच्यात असू शकते,का आपण उत्तरे शोधायच्या नादात ह्यांच्या फार आहारी जाऊन ह्यांना ताकत देतो?? परत एक प्रश्नच..
येवढे महत्वाचे असते का की आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळायलाच हवीत,काही अनुत्तरित राहिले तर काय बिघडेल? नाही जमले प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे तर त्याला अपयशी,वेडपट ठरवण्यात कुठले शहाणपण? आपण फक्त दोनच गोष्टी बघतो,एक यशस्वी ज्याला सगळे प्रश्न सोडवता आले,दुसरा अयशस्वी ज्याला न्ही सोडवता आले, पण आपण ह्या दोहोंचा मधला पर्याय निवडला तर ह्या प्रश्नांचा भीती आपल्या आयुष्यात कमी राहील,ह्याच्या जोखडातून आपण मुक्त राहू शकू. तो मधला मार्ग म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधत बसायचे नाही,जी शोधली त्याचे यश,समाधान मानायचे,जी अनुत्तरित राहिली ती सोडून द्यायची. हे केले तर ह्या प्रश्नाचे भूत आपल्या मानगुटीवरून उतरू शकेल,माणूस प्रश्नांना घाबरणे सोडून देईल व सुखी होईल.
सद्ध्या माणूस आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळावं ह्या नादात ज्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळलियेत त्याचे समाधान सुद्धा गमावून बसलाय. प्रश्नांसाठी माणूस जगतोय, खरेतर माणसांनी चांगले जगावे, प्रगती करावी यासाठी प्रश्न होते,पण होतंय उलटेच.
आपल्या आयुष्यात कुठून कुठून आणि कसे कसे प्रश्न येतात, काहींची उत्तरे सुखावून जातात,काही दुखः देऊन जातात,काही प्रश्नांची उत्तरं आयुष्यातून उठवतात. काही प्रश्नांची उत्तरं न शोधलेलीच बरी वाटतात,ती अनुत्तरीतच राहिली तर सुखी होता येतं. काही प्रश्नांची उत्तरं आपण बरोबर जरी दिली,शोधली तरी समोरचा प्रश्न विचारणारा माणूस ती उत्तरे बरोबर नाहीतच, किवा त्याची उत्तरे तुला मिळणारच नाही हेच सांगणारा,अशावेळेस हे प्रश्न जीवघेणे ठरतात हे मात्र खरे.
असो,विषयांतर झाले जरा, तर असां ह्या प्रश्नाचा महिमा. प्रश्न व्यवस्थित वापरून प्रगती करायची का प्रश्नांमुळे वेडे व्हायचे हे ज्याचे - त्यानी ठरवायचे.
आशुतोष दंडगव्हाळ....

छान लिहिले
ReplyDeleteछान लिहिले
ReplyDeletePratyek uttar navin prashnana janma dete. Ha kadhihi na sampnara pravas ahe. Milalele prashna prioritize karun sodvat rahave ani pudhe chalat rahave
ReplyDeleteबरोबर, पण हे बरेचदा आपण निर्माण करत असलेल्या प्रश्र्नांबद्दल होते...
Deleteबरोबर, काही प्रश्नांशी कुस्ती न खेळता वाट पाहावी हेच बरं. ते आपोआप सुटतात तरी किंवा उत्तर तरी सापडते. शिवाय काही प्रश्नांचे संदर्भ सुद्धा कालांतराने बदलतात.
ReplyDeleteपण एकंदरच प्रश्न सोडवल्या नंतरचा आनंद निराळाच. त्यामुळेच उत्तर न मिळण्याचा संबंध आपण थेट स्वतःच्या क्षमतांशी जोडतो.
अशा वेळी आपल्या प्रभावा बाहेरच्या, आकलना पलीकडच्याही काही गोष्टी असतात हे लक्षात ठेवणे नक्कीच मदत करू शकते.
नक्कीच 👍🏻👏🏻👏🏻
Delete