१६.४.१८.
स्वतःची किंमत स्वतः ठेवावी....
एक नेहमीची तक्रार ऐकू येते,माझी कोणाला काही किंमतच नाही, मी सगळ्यांसाठी मर मर मरायचे त्याचे कोणाला काहीच नाही,अरे बाबा पण तू स्वतः स्वतःला कधी किंमत देतोस का,जर नसशील तर मग दुसऱ्याकडून का अपेक्षा की ते तुझी किंमत ठेवतील? अशी तक्रार करणाऱ्यांनी खरंच पहिले हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा,हो की नाही,तुम्हाला काय वाटते?
आपण कधीकधी स्वतःला ऐवढे खाली करून ठेवतो की समोरचा माणूस पण आपली किंमत करायला लागतो, असे होणे खरंच चुकीचे, त्यात काही लोक तर स्वतः बरोबर कुटूबियांचा पण सन्मान गमावून बसतात. हे खरेच चुकीचे. स्वतःचा सन्मान,किंमत ही ठेवलीच पाहिजे,तेव्हाच बाकीच्यांची आपण ठेऊ शकतो,आणि ते बघून समोरचा माणूस पण तो सन्मान, किंमत ठेवतो वा देतो.
साधे उदाहरण घ्या आपल्या कडच्या राजकारण्यांचे, स्वतःच्या मुलाला ते कधीच साध्या त्याच्या नावाने हाक मारत नाहीत,त्यामागे साहेब किवा राव लावतात.( दादासाहेब,भाऊसाहेब,रावसाहेब अजून असेच काही काही.) त्याला कारण आहे, लोक बघतात स्वतः वडील जर मुलाला असे साहेब वगैरे लावून बोलावतात मग आपण एकेरी उल्लेख कसा करायचा,म्हणून मग लोक पण त्या पंधरा वर्षाच्या मुलाला दादासाहेब वगैरे बोलावतात,ह्यातून होते काय तर आपोआप त्या मुलाला मोठेपण येते,आदर मिळतो,लोकपाल चारदा विचार करतात काही अपशब्द बोलायला.
तेच दुसरी बाजू घ्या,तुम्ही तुमच्या मुलांना नेहमी घालून पाडून बोलत रहा,हरकाम्या करा,बाहेरची लोक पण त्याला तसेच वागवतील, खरे वाटत नसेल तर करून बघा, तुमची खात्री पटेल.
काही समजातील लोक बघा स्वतःच्या चालीरीती, देवधर्म, पूर्वापार आलेल्या प्रथा जीवापाड जपतो अगदी कुठेही राहिला तरी, म्हणून त्यांची ते कुठेही राहत असले तरी भरभराट होते,सगळे बाकीचे लोक पण त्यांच्या चालीरितींचा सन्मान करतात,तो समाज आपोआप मोठा होतो. ह्यात काय झाले त्या समाजातल्या लोकांनी स्वतः पहिले आपला सन्मान केला,म्हणून बाकीच्यांनी त्यांचा सन्मान ठेवला. असो असे खूप उदाहरणे देता येतील.
शेवटी काय तर, सन्मान,महत्त्व,किंमत, हे दुसरे कोणी देण्यापेक्षा स्वतःचे स्वतःच ठेवा,म्हणजे समोरून पण तो तसाच परत मिळेल,आणि खरंच आहे ते,स्वतःचा,आपल्या घरातल्या लोकांचा,आपल्या काम करण्याच्या जागेचा,तिथल्या लोकांचा, आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा सन्मान आपणच ठेवायला हवा. तेव्हाच समोरचा पण सन्मान करेन...
हो की नाही..
आशुतोष दंडगव्हाळ...

Brobar ahe 👌👍
ReplyDeleteMhnane patnyasarkhe, dyayla hawa maan!!
ReplyDelete