दि. २२.४.२०१८
" रंगोली "....
टीव्ही, जो आजकाल प्रत्येक घरात एक तरी आहेच, तर हा टीव्ही जेव्हा भारतात अाला त्या वेळेस एकच चॅनल दिसायचे ते दूरदर्शन, भारताचे स्वतःचे चॅनल, तर ह्या चॅनल वर एक से एक नितांत सुंदर कार्यक्रम असायचे,त्यातला एक जुन्या गाण्यांचा कार्यक्रम जो माझेमते जवळपास आपल्या अगोदरच्या निदान दोन पिढ्या तर नक्कीच बघत असतील,( तुम्ही म्हणाल कधी सुरू झाला त्याचे वर्ष वगैरे तर सांग, तर अगदी प्रांजळपणे सांगतो मला वर्ष वगैरे आठवण रहात नाही, जो माणूस मला तारीख आणि वर्षा सकट काही आठवणी सांगतो त्याचा मला नितांत आदर वाटतो,आणि भितीपण, कारण त्यांनी मला विचारू नये तुझा १० वी चा इंग्लिश चा पेपर कुठल्या तारखेला होता, किवां तुझे ग्रज्युएशन कधी पूर्ण झाले आणि अजून काय काय, असो हा झाला गमतीचा भाग,तर सांगायचे एवढेच की हा कार्यक्रम कुठल्या साली वगैरे चालू झाला ते आपण सुज्ञ वाचकांनी मला विचारू नये,😊😊) ऐवढा जुना,पण आजही आवर्जून बघावा असा, तो म्हणजे "रंगोली".
प्रत्येक रविवारी सकाळी हा 8 वाजता सुरू 9 ला संपणारा, शनिवारी कितीही झोपायला उशीर झाला तरी,रविवारी 7 ला उठून तयारी करून टीव्ही समोर जाऊन बसायचे कधी हा कार्यक्रम चालू होतो त्याची वाट बघत. जुनी नितांत सुंदर गाणी,ताजा आलेला पेपर ,गरमागरम चहा,त्यात काही बुडवायला असले तर सोने पे सुहागा,अशी जय्यत तयारी करून हा कार्यक्रम बघण्यात जे सुख आहे ना ते शब्दात सांगणे अवघड,हो आता प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतीलही,पण माझ्यासारखे काही असतील ज्यांना ह्यात सुख, आनंद मिळत असेल,मिळवत असतील, आणि आहेत पण बरका..
आता तुम्ही मला वेड्यात काढाल,की काय हा माणूस,कुठल्या जुण्यापुरण्या काळातल्या गोष्टी करतो,आज एक बटण दाबले की पाहिजे ते गाणे ऐकता येते,तर मग रविवारी हक्काच्या सुट्टीच्या दिवशी छान झोपायचे सोडून सकाळी रंगोली बघायला उठायला सांगतोय.., पण खरेच सांगतो, भले आज पाहिजे ते,पाहिजे तेव्हा कुठलीही गोष्ट आपण बघू शकतो, मिळऊ शकतो, त्यातही आनंद आहेच आहे,नाही असे नाही,पण अनपेक्षित पणे ,मनात नसताना, किवा अपेक्षा नसताना एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर त्याचा आनंद वेगळाच,आणि एक वेगळे सुख देणारा असतो,हे कोणीही मान्य करायलाच हवे.
तुमच्या आवडीची खूप गाणी असतील, ती तुम्ही वेळोवेळी तुमच्या कडच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जमा करून ठेवता,पाहिजे त्या वेळेस ऐकायला, आणि ऐकतोही ती आपण,त्यातही सुख,आनंद असतोच. पण अनपेक्षित पणें एखादे रफी ,लताचे, किवां अजून कोण्या आवडत्या गायकाचे आवडते गाणे ऐकायला मिळाले, किवा लागले तर जो आनंद होतो ना तो स्टोअर करून ऐकायच्या गाण्याने होत नाही ,मिळत नाही. त्यामुळेच हा कार्यक्रम माझ्यासारखी वेडी लोक अजूनही जगभरात बघतायत, कारण त्यातून मिळणारा आनंद हा खूप वेगळा आहे.....
ह्या रंगोली बद्दल माझ्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो,रुबी हॉस्पिटल मध्ये माझे कॅन्सर चे ऑपरेशन झाले, त्यानंतर सात दिवस तिथेच होतो, त्यात रविवार होता,आदल्या दिवशी मी नर्स ला सांगितले होते,अहो मॅडम आम्हाला उद्या रंगोली बघायचीये,तेवढे सकाळी आम्हाला टीव्ही पाहू द्या,आणि रुबी मध्ये सुद्धा आम्ही रंगोली पहिली.
आजही दर रविवारी सगळ्यांना " उठा रे रंगोली सुरू होईल आता" मेसेज पाठवताना खूप छान वाटते......
आशुतोष दंडगव्हाळ....

Khupch sundar lekh ahe Rangoli var 👌
ReplyDeleteThat is why its called Rangoli all colours of our emotions comes out
ReplyDeleteyes it's true we receive every Sunday utha re rangoli suru zali ☺👍
True. Rangoli is best!
ReplyDeletelekh changla ahe.wegwegli Bhavna pradhan gani pahayla miltat yat. ti mja store keun aiklelya ganyat nah, he khare!!!
ReplyDelete