Wednesday, February 28, 2024

II ॐ गण गणपतये नमः II

 दि. २८/०२/२०२४....


आज संकष्टी, लहान - मोठ्यांच्या आवडत्या देवाची गणपती बाप्पाची पूजा,उपवास,दर्शन,मोदक आणि बरेच काही...

सर्व जगभर वेगवेगळ्या अवतारात, नावांमध्ये ह्या देवाची पूजा होते गणाधिपती गणपती...

हो तर हे सगळे लिहावेसे वाटले कारण आज दुपारी संकष्टी निमित्त  मराठी चित्रपट "अष्टविनायक " लागला होता कुठल्या तरी मराठी चॅनल वर, ह्या चित्रपटाची कथा, त्यातले गाजलेले आणि प्रत्येक गणपतीला सगळ्या घरांमध्ये लागणारे "अष्टविनायका तुझा महिमा कसा " हे गाणे.

ह्या चित्रपटाची कथा तशी खूपच साधी आहे,पण चित्रपट बघताना असेच वाटत राहते की हे सगळे आपले आयुष्यच आपल्यापुढे चलचित्र बनून डोळ्यांपुढे दिसतेय. मी हा चित्रपट खूप वेळा पाहिलाय,आणि प्रत्येकवेळी डोळे कधी गळू लागतात कळतच नाही, गाणे ऐकताना तर अगदी ऊर भरून येतो,आणि डोळ्यातून अश्रू वाहून गेल्यावर एकदम हलके वाटते, मनाची मरगळ ,भीती निघून गेलेली असते,सगळे सोपे सोपे वाटायला लागते.

( चित्रपटाची कथा,पात्र,कलाकार ह्याबद्दल काहीच सांगणार नाही,हो मुद्दामून च नाही सांगणार,कारण हा चित्रपट बघून अनुभवण्यासाठी आहे, सांगून ह्यातले भाव कळणार नाहीत,म्हणून तो अवश्य बघा आणि सांगा मी जे अनुभवले ते तसेच तुम्हाला वाटले की नाही..ते)..

आयुष्यात असे काही क्षण किवा परिस्थिती येते की तेव्हा सगळे संपले असे वाटते, आणि त्याच वेळेस एखादी दैवी शक्ती आपल्याला त्या संकटातून तारून नेते, बाहेर काढते, अगदी सहजपणे,जणू काही ते संकट कधी नव्हतेच..

तुम्हाला असे काही होते का? नक्की सांगा....

आशुतोष दंडगव्हाळ....


4 comments:

  1. दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
    जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥
    संत कबीरांच्या ह्या दोह्यात म्हंटल्याप्रमाणे माणूस सुखात देवाला विसरतो. त्याउलट देवाच्या अस्तित्वाची गरजच अमान्य करतो. पण तरीही दुःख आल्यावर ह्याच माणसाने दिलेली आर्त हाक ऐकून परमेश्वर दयाळूपणे मदतीला धावून येतोच. म्हणूनच कदाचित पांडूरंगाला आपण विठाई असं म्हणतो.
    काही कलाकृती आपल्या आयुष्याच्या बऱ्यावाईट प्रसंगांची आणि त्यांतून देवाने वाट काढून दिल्याची आठवण करून देतात अशावेळी आपसूकच डोळ्यात पाणी तरळते ते केवळ आणि केवळ कृतज्ञतेच्या भावनेने, ह्या विचाराने की देव आपल्या पाठीशी कायम असतो - जरी आपण वरचेवर ह्या गोष्टीला विसरत असलो तरीही.

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम खरे, छान वाटते जेव्हा आपल्याला नेमके काय सांगायचे ते समोरच्याला कळते तेव्हा....☺️

      Delete
  2. 👌Very Simply & Nicely written Ashu
    Will definitely love to watch the movie

    ReplyDelete

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...